जीपच्या धडकेत शिक्षक ठार; राहुटीजवळील घटना
By Admin | Updated: July 7, 2016 12:39 IST2016-07-07T12:39:28+5:302016-07-07T12:39:51+5:30
मुलीला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करुन घराकडे निघालेल्या शिक्षकाचा जीपने धडक दिल्याने मृत्यू झाला.

जीपच्या धडकेत शिक्षक ठार; राहुटीजवळील घटना
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७- मुलीला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करुन घराकडे निघालेल्या दुचाकीस्वार शिक्षकास समोरुन येणाºया जीपने धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. प्रताप चंद्रकांत गायकवाड (वय- ५१, रा. अंकोली, ता. मोहोळ) असे मयताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास कोंडीजवळील राहुटी येथे हा अपघात घडला.
मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील शिक्षक असलेले प्रताप चंद्रकांत गायकवाड आज सकाळी मुलगी आजारी असल्यामुळे तिला सोलापुरात नेऊन खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दवाखान्यातील प्रक्रिया आटोपून ते परत आपल्या गावी अंकोली येथे एम. एच. १३ बीए ५३८३ या दुचाकीवरुन निघाले होते. त्यांची दुचाकी सोलापूर विद्यापीठ पार करुन कोंडीजवळील राहूटीजवळ आली असताना समोरुन येणाºया एम. एच. १४ सीएक्स ४०३७ या जीपने जोरदार धडक दिली. यात प्रताप गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करुन पुढील कारवाईसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी मयत घोषित केले.