जे.डी. भरडा शाळा लावणार दीड हजार झाडे

By Admin | Updated: June 30, 2016 02:27 IST2016-06-30T02:27:02+5:302016-06-30T02:27:02+5:30

वनमहोत्सवांतर्गत २ कोटी झाडे लावण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. त्याअंतर्गत प्रत्येक शाळेला २० झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले

J.D. A half-a-dozen trees will be set up for the school | जे.डी. भरडा शाळा लावणार दीड हजार झाडे

जे.डी. भरडा शाळा लावणार दीड हजार झाडे


मुंबई : राज्यात वनमहोत्सवांतर्गत २ कोटी झाडे लावण्याचा निर्धार राज्य शासनाने केला आहे. त्याअंतर्गत प्रत्येक शाळेला २० झाडे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र मुंबईतील जे.डी. भरडा शाळेने शुक्रवारी दीड हजार झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा व्यवस्थापनाने घोषणेप्रमाणे दीड हजार झाडे लावल्यास मुंबईतील सर्वाधिक झाडे लावणाऱ्या शाळांत जे.डी. भरडा शाळेचे नाव पहिल्या क्रमांकावर असेल. शुक्रवारी सकाळी ११ वाजता बदलापूर येथील आंबेशिवगाव येथील रामदास आश्रम परिसरात ही झाडे लावणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका गीता उन्नीथन यांनी सांगितले.
उन्नीथन म्हणाल्या की, शाळेमार्फत लावण्यात येणाऱ्या दीड हजार झाडांमध्ये सीताफळ, पारिजात, गुलमोहर व अकेशिया या झाडांचा समावेश आहे. या उपक्रमात शाळेचे सर्व विद्यार्थी सहभागी होतील. यंदा प्रथमच राज्यात दुष्काळाच्या झळा सर्वच जिल्ह्यांना सहन कराव्या लागल्या. त्यामुळे विद्यार्थीदशेतच पर्यावरण जाणीव निर्माण व्हावी, म्हणून हा उपक्रम आयोजित केला आहे. तरी शिक्षक आमदार रामनाथ मोते व शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांच्या हस्ते वृक्षारोपण केले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: J.D. A half-a-dozen trees will be set up for the school