शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फसगत झाली तर..; लाडकी बहीण योजनेवरुन जयंत पाटील यांनी दिला इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:40 IST

सांगली : राज्यातील लाडक्या बहिणींनीच सरकारला निवडून दिल्याचे सत्ताधारी सांगताहेत. मात्र, आता निकष लावून लाडक्या बहिणींना योजनेपासून दूर केले ...

सांगली : राज्यातील लाडक्या बहिणींनीच सरकारला निवडून दिल्याचे सत्ताधारी सांगताहेत. मात्र, आता निकष लावून लाडक्या बहिणींना योजनेपासून दूर केले जात आहे. लाडक्या बहिणींना त्यांनी फसवले, तर त्या घराबाहेर येत सरकारला जाब विचारतील, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.जयंत पाटील म्हणाले, नवीन सरकार आले, तर लाडकी बहीण योजना बंद होईल, असा चुकीचा प्रचार निवडणुकीत करण्यात आला. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींनी विद्यमान सरकारला भरभरून मते देत निवडून आणले. आता राज्यात त्यांनी निवडलेलेच सरकार आहे. त्यांच्या काळात योजनेचे पैसे मिळणे कठीण होत असेल, तर महिला त्या गोष्टी सहन करणार नाहीत. त्यामुळे सरकारने याबाबतची काळजी घ्यावी.बीडच्या प्रकरणात पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात काय तपशील आहे, याची मला माहिती नाही. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलांची नियुक्ती याप्रकरणी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असला तरी अद्याप सर्व संशयितांना अटक झालेली नाही. ती अटक झाल्याशिवाय खरी माहिती येणार नाही. त्यामुळे पोलिसांनी सर्व संशयितांना अटक करण्यासाठी प्रयत्न करावेत.

जळगावमधील प्रकार तर धक्कादायकचराज्यातील सर्व लाडक्या बहिणी वेगवेगळ्या ठिकाणी संकटांचा सामना करीत आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची जळगाव जिल्ह्यात छेड काढली गेली. तरीही पोलिसांनी त्यांना दाद दिली नाही. त्यावर पोलिस किती निर्ढावलेले आहेत, हे दिसून येते. महिला अत्याचाराबाबत गृहखात्याकडून कसे दुर्लक्ष होत आहे, विलंब कसा केला जातो, या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत, असे जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगलीladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाJayant Patilजयंत पाटीलGovernmentसरकार