शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेचा दुरुपयोग, विरोधकांकडून सुडाचे राजकारण - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 18:42 IST

Jayant Patil : विरोधात बोलणार्‍यांना तपास यंत्राणांमार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे. याबाबत जनता सुज्ञ आहे वेळ येताच जनता धडा शिकवेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

सोलापूर : सत्तेचा दुरुपयोग विरोधक कसा करतात, हे राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अटकेवरून दिसून येत आहे, असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करमाळा येथील परिसंवाद कार्यक्रमात बोलताना केला आहे. आतापर्यंत विरोधकांनी सुडाचे राजकारण सुरू केले आहे. अनेक सरकारे आली आणि गेली कोणीही सत्तेवर आले, तरी असे कायम टिकत नाही. सध्या सुडाचे राजकारण चालू आहे. विरोधात बोलणार्‍यांना तपास यंत्राणांमार्फत अटक करून कारवाई करण्याचा प्रकार विरोधकांनी चालू केला आहे. याबाबत जनता सुज्ञ आहे वेळ येताच जनता धडा शिकवेल, असे म्हणत जयंत पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधला. 

आमदार संजय मामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालय समोर राष्ट्रवादी काँग्रेसची परिसंवाद आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या आढावा बैठकीत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. यावेळी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेमुळे जयंत पाटील हे उद्विग्न  झाल्याचे दिसत होते. जनता याबाबत योग्य ते निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. गेल्या काही महिन्यापासून केंद्र सरकारी तपास यंत्रणाच्या माध्यमातून कशा दुरुपयोग करते, विरोधकांना कशी अडकवते याविषयी पुराव्यानिशीनवाब मलिक यांनी अख्ख्या देशाला उघड करून दाखवले होते, याचा सूड विरोधकांनी अशा प्रकारातून व्यक्त केल्याचे दिसते, असे जयंत पाटील म्हणाले. 

तसेच, यावेळी व्यासपीठावरील माजी आमदार जयवंतराव जगताप यांना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक आमदार संजय मामा शिंदे यांना पेचात टाकणारे प्रश्न उपस्थित केले. संजय मामा शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपण सहभागी होऊन जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची खुली ऑफर कार्यक्रमादरम्यान दिली. याचबरोबर, संजय मामा शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत असे कार्यकर्त्यांच्या गळ्यातील गमजा घेऊन व्यासपीठावरील एका पदाधिकाऱ्याने संजय मामा शिंदे यांच्या गळ्यात घालून सन्मान करण्याचा विनंती केली होती. त्यावेळी जयंत पाटील यांनी संजय मामा हे राष्ट्रवादीचेच आहेत त्यांना राष्ट्रवादीचा गमजा घालण्याची काही आवश्यकता नाही असे व्यासपीठावरून सांगितले. तसेच, आज माझा सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील शेवटचा कार्यक्रम आटपून इंदापूरकडे रवाना होणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSolapurसोलापूर