राजकीय कोंडीमुळे जयंत पाटील पर्यायांच्या शोधात

By Admin | Updated: December 10, 2014 01:38 IST2014-12-10T01:38:03+5:302014-12-10T01:38:03+5:30

पंधरा वर्षानंतर मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे वनजदार नेते आमदार जयंत पाटील यांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे.

Jayant Patil searches for alternatives to political mafia | राजकीय कोंडीमुळे जयंत पाटील पर्यायांच्या शोधात

राजकीय कोंडीमुळे जयंत पाटील पर्यायांच्या शोधात

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
पंधरा वर्षानंतर मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे वनजदार नेते आमदार जयंत पाटील यांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळे कार्यकत्र्यात अस्वस्थता आहे. वरवर शांत दिसत असले तरी अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांचे निकराचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला धक्का देण्याची तयारी केल्याची चर्चा एकीकडे आहे, तर दुसरीकडे याच पक्षात राहून स्वत:च्या गटाची मजबूत बांधणी करण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचे बोलले जात आहे.
सध्या जयंत पाटील यांनी आफ्रिकेत घेतलेल्या जमिनी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात भाजपाचे सरकार आल्याने ते राजकीय कोंडीत सापडले आहेत. कारण जिल्हा बँकेतील गैरव्यवहारासारखे जिल्ह्यातील अनेक प्रश्न चव्हाटय़ावर येऊ लागले असून, त्या प्रश्नांवर विधानसभेत त्यांना सामोरे जावे लागणार आहे. पाटील यांनी मंत्रिपदाच्या काळात इस्लामपूर व परिसरात कार्यकत्र्याना गारमेंट उद्योग उभे करण्यास पाठबळ दिले, परंतु हा उद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या पेठनाक्यावरील खासगी प्रकल्पात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. तेथे मतदारसंघातील हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले होते, परंतु पगाराच्या प्रश्नावरून त्यातील अनेकांनी काम बंद केले आहे. 
 
जयंत पाटील गेले काही दिवस परदेश दौ:यावर होते. सध्या ते हिवाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यानंतर मतदारसंघातील प्रमुख कार्यकत्र्याशी विचारविनिमय करून संस्थात्मक बांधणीसह राष्ट्रवादीला भक्कम करणो अथवा इतर निर्णय घेणो याबद्दल बैठक निश्चित करण्यात आली आहे.
- बी. के. पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस

 

Web Title: Jayant Patil searches for alternatives to political mafia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.