शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचं आयटी सेल तोंडघशी; जयंत पाटलांनी दिली स्टीकर वापरल्याची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 16:55 IST

पाटील यांच्या कबुलीनंतर मात्र राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आयटी सेल तोंडघशी पडले असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

मुंबई - सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरात अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्यतीची प्रयत्न केले जात आहे. मात्र दुसरीकडे राजकीय नेते पूरग्रस्तांना मदतीची सुद्धा जाहिरात करत असल्याचे समोर आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणक यांच्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा पूरग्रस्तांना मदत करताना मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावून जाहिरातबाजी केली असल्याची बातमी सर्वात आधी 'लोकमत'ने प्रसिध्द केली होती. त्यांनतर राष्ट्रवादीकडून हा फोटो खोटा असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र जयंत पाटलांनी स्टीकर वापरल्याची कबुली दिल्याने राष्ट्रवादी पक्षाचे नेते तोंडघशी पडले आहे.

सांगली आणि कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावून भाजपने जाहिरातबाजी केली असल्याचे समोर आले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी सुद्धा मदत पॅकेटच्या बॉक्सवर स्व:ताची फोटो लावल्याचे समोर आले होते. विशेष म्हणजे जयंत पाटील यांनी स्व:ताच्या अधिकृत फेसबुक पेजवर हे फोटो पोस्ट केली होती . मात्र 'लोकमत'वर बातमी प्रसिध्द होताच तो फोटो डिलीट करण्यात आला होता. तसेच हा फोटो खोटा असून फोटोशॉप वर बनवण्यात आला असल्याचा दावा राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आला होता .

एकीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आयटी सेल हा फोटो खोटा असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे खुद्द जयंत पाटील यांनी यांनी खाद्यपदार्थांसाठी आधीच छापलेले जुने बॉक्स वापरल्याची कबुली दिली आहे. त्यांनी अधिकृतरीत्या ट्विट करत ही माहिती दिली आहे. पाटील यांच्या कबुलीनंतर मात्र राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि आयटी सेल तोंडघशी पडले असल्याची चर्चा पहायला मिळत आहे.

पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे येत आहेत. मात्र राजकीय नेते आपल्या मदतीतून सुद्धा स्व:ताची जाहिरातबाजी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी पक्षाला सोशल मिडीयावर नेटकरी ट्रोल करत असल्याचे पहायला मिळत आहे.