जायकवाडीने तळ गाठला
By Admin | Updated: July 14, 2014 04:32 IST2014-07-14T04:32:02+5:302014-07-14T04:32:02+5:30
पावसाने दडी मारल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा तळ गाठण्याच्या मार्गावर आहे. धरणाच्या उपयुक्त साठ्यात केवळ २.७६ टक्केच पाणी शिल्लक आहे

जायकवाडीने तळ गाठला
औरंगाबाद : पावसाने दडी मारल्याने जायकवाडी धरणातील पाणीसाठा तळ गाठण्याच्या मार्गावर आहे. धरणाच्या उपयुक्त साठ्यात केवळ २.७६ टक्केच पाणी शिल्लक आहे. बाष्पीभवन आणि रोजच्या वापराचा विचार करता हा साठा १२ आॅगस्टपर्यंतच पुरणार असल्याचे औरंगाबाद लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (कडा) अधिकाऱ्यांनी सांगितले.
जायकवाडी धरणाचे पाणी औरंगाबाद आणि जालना शहरासह अनेक लहान-मोठ्या गावांना पुरविले जाते. कडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १२ आॅगस्टनंतर मृतसाठ्यातून उपसा करावा लागेल. धरणाची क्षमता २,१७१ द.ल.घ.मी. असून सध्याचा उपलब्ध साठा ६० द.ल.घ.मी. आहे. (प्रतिनिधी)