जवखेडे हत्याकांडातील आरोपींचे रक्तनमुने घेतले
By Admin | Updated: January 19, 2015 04:28 IST2015-01-19T04:28:21+5:302015-01-19T04:28:21+5:30
जवखेडे खालसा हत्याकांडातील तिन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्याची परवानगी पाथर्डी न्यायालयाने दिल्यानंतर आरोपींच्या रक्ताचे नमुने

जवखेडे हत्याकांडातील आरोपींचे रक्तनमुने घेतले
अहमदनगर : जवखेडे खालसा हत्याकांडातील तिन्ही आरोपींची डीएनए चाचणी करण्याची परवानगी पाथर्डी न्यायालयाने दिल्यानंतर आरोपींच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने गांधीनगर (गुजरात) येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.
जवखेडेतील हत्येप्रकरणी प्रशांत, अशोक आणि दिलीप जाधव यांना पोलिसांनी अटक केली असून, ते न्यायालयीन कोठडीत आहेत. नार्को चाचणीमुळेच हे तिघे जण प्रमुख आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. घटनेचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे. आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी जिल्हा रुग्णालयाला पत्र देऊन आरोपींच्या रक्ताचे नमुने घेण्याचे आदेश दिले होते.
मृतांच्या अंगावरील रक्त, आरोपींच्या कपड्यांवरील रक्ताचे डाग हे मिळतेजुळते आहे का, याची तपासणी करण्यासाठी पोलिसांसमोर डीएनए चाचणीशिवाय दुसरा पर्याय नव्हता. (प्रतिनिधी)