जवखेडे हत्याकांडात फिर्यादीच आरोपी!
By Admin | Updated: December 5, 2014 04:06 IST2014-12-05T04:06:17+5:302014-12-05T04:06:17+5:30
पूर्ण राज्यात ४३ दिवसांपासून गाजत असलेल्या जवखेडे खालसा येथील दलित जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्या प्रकरणात बुधवारी

जवखेडे हत्याकांडात फिर्यादीच आरोपी!
पाथर्डी / अहमदनगर : संपूर्ण राज्यात ४३ दिवसांपासून गाजत असलेल्या जवखेडे खालसा येथील दलित जाधव कुटुंबातील तिघांच्या हत्या प्रकरणात बुधवारी
मध्यरात्री पोलिसांनी प्रशांत जाधव याला अटक केली. प्रशांत हा मयत संजय जाधव यांचा पुतण्या असून, तोच या गुन्ह्यातील फिर्यादी आहे. त्याला गुरुवारी पाथर्डीच्या न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायदंडाधिकारी शिवाजी केकाण यांनी त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़
जवखेडे खालसा येथील संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री व मुलगा सुनील यांचा २० आॅक्टोबरच्या मध्यरात्री निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते विहिरीत, बोअरवेलमध्ये टाकण्यात आल्याचे दुसऱ्या दिवशी उघडकीस आले होते. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. बुधवारी रात्री पोलिसांनी या प्रकरणात फिर्यादी असलेला प्रशांत याला अटक केली. गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास त्याला पाथर्डी न्यायालयात आणण्यात आले. या वेळी प्रशांतच्या नातेवाईक महिलांनी आगपाखड करून पोलिसांवर आरोप केले.
हत्येचा उलगडा लवकरच
प्रशांतला झालेली अटक म्हणजे तपासातील प्रगती आहे. हत्याकांडामागील नेमक्या कारणांचा दहा दिवसांमध्ये उलगडा होईल. अन्य आरोपी कुटुंबातील, गावातील की बाहेरचे, याचाही उलगडा होईल.
- प्रवीण साळुंके,
विशेष पोलीस महानिरीक्षक