जव्हारच्या ७ तलाठी सजांचे कामबंद
By Admin | Updated: October 20, 2016 03:29 IST2016-10-20T03:29:01+5:302016-10-20T03:29:01+5:30
तालुक्यात एकूण १३ तलाठी सजा आहेत. तर सध्या कार्यरत असलेली तलाठी संख्या अवघी सहा आहे.

जव्हारच्या ७ तलाठी सजांचे कामबंद
जव्हार : तालुक्यात एकूण १३ तलाठी सजा आहेत. तर सध्या कार्यरत असलेली तलाठी संख्या अवघी सहा आहे. त्यामुळे सात तलाठी सजांचा भार या सहा जणांवर पडत आहे. म्हणून तलाठी संघटनेने ठरविलेल्या नुसार महिन्या भरपासून मूळ सजा पुरतेच काम करण्याचे निर्णय घेतले आहे. या तलाठ्यांनी आपल्या सजांचे काम करायचे अन्य अतिरिक्त दिलेल्या तलाठी सजांचे काम न करण्याचा निर्णय घेतल्याने नागरिकांची मोठी पंचायत निर्माण झाली आहे.
तालुक्यातील रिक्त असलेली तलाठी सजां देहेरे, जामसर, पाथर्टी, डेंगाचीमेट, वाळवंडा, वावर, तलासरी, या सात तलाठी सजांचे, काम बंद आहे. या सात सजा मिळून २४ महसूल गावे आहेत. त्यामुळे या सात तलाठी सजांच्या काम महिनाभरापासून बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. सात सजांच्या नागरिकांची कामे होत नसल्याने नागरिकही वैतागले आहेत.
अतिरिक्त असलेल्या सात सजांचे काम महिनभरापासून बंद असल्याने नागरिकांना अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरीकांची कामे, सातबारा व ८ अ काढणे, जातीचा दाखला, उत्पन्न दाखल्याची कामे रखडली आहेत.
>अतिरिक्त भाराचे कारण
देहेरे गावकऱ्यांना आमच्याकडे अतिरिक्त भार असल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही संघटनेने घेतलेला निर्णय आहे की, जोपर्यंत रिक्त जागा भरीत नाहीत, तोपर्यंत आम्ही दिलेल्या अतिरिक्त सजांची कामे करणार नाहीत, असे सांगितले.