पत्नीला ठार करून जवानाची आत्महत्या
By Admin | Updated: November 17, 2015 01:02 IST2015-11-17T01:02:37+5:302015-11-17T01:02:37+5:30
सासरा व पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना पातूर तालुक्याच्या

पत्नीला ठार करून जवानाची आत्महत्या
पातूर (जि. अकोला) : सासरा व पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना पातूर तालुक्याच्या माळराजुरा येथे सोमवारी सकाळी ९.३०च्या सुमारास घडली. हे हत्याकांड कौटुंबिक वादातून घडल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
छगन जाधव हा ४५ वर्षीय जवान सीआरपीएफच्या दिल्ली येथील युनिटमध्ये कार्यरत होता. गेल्या आठवड्यात तो घरी सुट्टीवर आला. वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथे राहणारे त्याचे सासरे मखराम राठोड हे सोमवारी सकाळी मुलगी सुशीलाला माहेरी नेण्यासाठी आले. सकाळी तिघांनीही चहा घेतला. काही वेळानंतर छगन स्वत:च्या रूममध्ये गेला आणि बंदूक आणून त्याने पत्नी सुशीला व मखराम राठोड यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर छगनने स्वत:च्या हनवटीवर बंदूक ठेवून गोळ्या झाडल्या. अतिरक्तस्रावाने त्याचा मृत्यू झाला. (वार्ताहर)