पुणे : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा स्व. जवाहरलाल दर्डा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना जाहीर झाला आहे.राज्याचे महसूल, बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि ‘लोकमत’ चे समूह संपादक दिनकर रायकर यांच्या हस्ते उद्या, गुरूवारी (दि. २९) या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पन्नास हजार रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी राज्य मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर ‘लोकमत’चे संपादक राजा माने यांनाही गौरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
अनंत दीक्षित यांना जवाहरलाल दर्डा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2016 02:45 IST