भारत-पाक शांतीचर्चा पुन्हा सुरू व्हावी- जतीन देसाई

By Admin | Updated: June 3, 2016 16:56 IST2016-06-03T16:56:21+5:302016-06-03T16:56:21+5:30

दोन्ही देशांनी लोकांना व्हिसा देण्यासंदर्भातही विचार करायला हवा. यासाठी जनतेनंही दबाव आणण्याची गरज असल्याचं वक्तव्य जतीन देसाई यांनी केलं

Jatin Desai to resume Indo-Pak peace talks | भारत-पाक शांतीचर्चा पुन्हा सुरू व्हावी- जतीन देसाई

भारत-पाक शांतीचर्चा पुन्हा सुरू व्हावी- जतीन देसाई

 ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 3- लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे आयोजित 'नॉलेज सीरिज अंतर्गत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध' या चर्चासत्रात जतीन देसाईंनी या कार्यक्रमाला संबोधित केलं आहे.
ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाईंनी व्यासपीठावर स्वतःचे विचार मांडले आहेत. भारत-पाकमध्ये एकमेकांचे पत्रकार पाहिजेत. त्यामुळे दोन्ही देशांतील माहिती एकमेकांना समजू शकेल. दोन्ही देशांनी लोकांना व्हिसा देण्यासंदर्भातही विचार करायला हवा. यासाठी जनतेनंही दबाव आणण्याची गरज असल्याचं वक्तव्य जतीन देसाई यांनी केलं आहे. 
तरुणालाही इतिहासात नसून वर्तमानात रस असल्याचं मत यावेळी जतीन देसाई यांनी मांडलं आहे. पठाणकोटमुळे थांबलेली शांती चर्चा पुन्हा सुरू व्हावी, असं ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी मांडलं आहे. 

Web Title: Jatin Desai to resume Indo-Pak peace talks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.