शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

बीड सरपंच हत्याप्रकरणी राज्य सरकारला ७ जानेवारीची मुदत, अन्यथा..;  सरपंच परिषदेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 16:50 IST

'राज्यात अशा घटना घडणे चिंताजनक'

कोल्हापूर : बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरण, धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाला पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न यासह राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले, अशा घटनांचा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेने निषेध केला असून, ७ जानेवारीपर्यंत आरोपींना अटक करण्यासाठी डेडलाइन दिली आहे. तोपर्यंत राज्य सरकारने जर ठोस निर्णय घेतला नाही, तर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच मुंबईत धरणे धरतील, असा निर्णय महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे यांनी घेतला आहे.महाराष्ट्र प्रदेश सरपंच परिषदेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावच्या माजी सरपंचाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच पुन्हा धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून त्यांना पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या दोन घटनांबरोबरच राज्यात सातत्याने सरपंचांवर होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे सरपंच परिषद आक्रमक झाली आहे.

राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक आहे. सरपंचांनी गाव कसा चालवायचा? सरपंच आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी, असा प्रश्न करीत या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी राज्य सरकारकडे सरपंच परिषदेचे अध्यक्ष जी. एम. पाटील (आजरा) यांनी केली आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणGovernmentसरकार