जनशताब्दी एक्सप्रेसला जेसीबीची धडक, काही प्रवासी जखमी
By Admin | Updated: December 7, 2014 17:40 IST2014-12-07T17:40:40+5:302014-12-07T17:40:40+5:30
कोकण रेल्वेवर सिंधुदुर्गजवळ मुंबईच्या दिशेने येणा-या जनशताब्दी एक्सप्रेसला खासगी जेसीबीने धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

जनशताब्दी एक्सप्रेसला जेसीबीची धडक, काही प्रवासी जखमी
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि.७ - कोकण रेल्वेवर सिंधुदुर्गजवळ मुंबईच्या दिशेने येणा-या जनशताब्दी एक्सप्रेसला खासगी जेसीबीने धडक दिल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून सध्या कणकवली स्थानकात ही एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील बोर्डवे येथे जेसीबी मशिनने जनशताब्दी एक्सप्रेसला धडक दिली. यात तीन डब्याचे नुकसान झाले असून काही प्रवासीही जखमी झाले. यामध्ये काही प्रवासीही जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने प्रसारमाध्यमांना सांगितले. आठ प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त असले तरी प्रशासनाने याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. अपघात नेमका कसा घडला हे स्पष्ट झाले नाही. मात्र यामुळे कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. काही वेळात वाहतूक पूर्ववत होईल असे समजते.