‘जनशताब्दी’ला अपघात

By Admin | Updated: December 8, 2014 02:27 IST2014-12-08T02:27:01+5:302014-12-08T02:27:01+5:30

कोकण रेल्वे मार्गावरील बोर्ड वे पुलानजीक जनशताब्दी एक्स्प्रेसवर रविवारी जेसीबी कोसळून १६ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी एकाची स्थिती गंभीर आहे.

'Janshatabadi' accident | ‘जनशताब्दी’ला अपघात

‘जनशताब्दी’ला अपघात

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावरील बोर्ड वे पुलानजीक जनशताब्दी एक्स्प्रेसवर रविवारी जेसीबी कोसळून १६ प्रवासी जखमी झाले. जखमींपैकी एकाची स्थिती गंभीर आहे.
कणकवलीतील अबीद नाईक यांचा जेसीबी कसवण-बोर्ड वे पुलावरून सर्व्हिस रोडने क्रशरकडे जात होता. दुपारी सव्वाचारच्या सुमारास या जेसीबीच्या पुढील चाकांचा एक्सेल तुटला आणि तो टेकडीवरून ४० फूट खाली कोसळला आणि त्याचवेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेसवर तो आदळला. रेल्वेची डावी बाजू जेसीबीने कापत गेली. यामुळे रेल्वेमधील प्रवाशांमध्ये घबराट पसरली. जेसीबी कोसळताना तिचा चालक बाहेर फेकला गेला. दहा मिनिटांनंतर पुढे कणकवली स्थानकावर रेल्वे आणून थांबवण्यात आली. रेल्वेच्या पहिल्या गार्ड केबिनसह दोन आरक्षित बोगी आणि एक एसी बोगी डाव्या बाजूने कापल्या गेल्या. (प्रतिनिधी)

Web Title: 'Janshatabadi' accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.