पुण्यात जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्याला मारहाण
By Admin | Updated: March 6, 2017 05:14 IST2017-03-06T05:14:59+5:302017-03-06T05:14:59+5:30
जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास कोथरूडमधील मोरे विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली

पुण्यात जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्याला मारहाण
पुणे : महाविद्यालयात झालेल्या भांडणाचा राग मनात धरून जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना शनिवारी रात्री दहाच्या सुमारास कोथरूडमधील मोरे विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घडली. या प्रकरणी तिघा जणांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहाजमान अहमददार (२५) याने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी चेतन भारद्वाज, रजित भाटिया, विकास जिगरन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहाजमान हा भारती विद्यापीठातील आयएमईडी विभागात शिक्षण घेत आहे. आरोपींपैकी काही विद्यापीठाच्याच विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. दोन्ही महाविद्यालयांचा परिसर एकच आहे. दोन दिवसांपूर्वी अहमददार आणि आरोपींमध्ये हाणामारी झाली होती. शनिवारी शहाजमान हा मोरे विद्यालयासमोर सरबत पिण्यासाठी गेला असता आरोपींनी त्याला गाठले. त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रजित भाटियाने हत्याराने त्याचे कपाळ व नाकावर वार केले. (प्रतिनिधी)