शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

Jammu & Kashmir: कोल्हापूरच्या जावयानेच सोडवला काश्मीर प्रश्न; सोशल मीडियावर मेसेज व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 4:42 AM

रेड फॉर काश्मीर हॅशटॅगने काहींचा निर्णयाला विरोध

मुंबई : ‘शेवटी काश्मीर प्रश्न कोल्हापूरच्या जावयानेच सोडवला, दाजी विषय हार्ड’, ‘जे मोदींना ६० महिन्यांत जमले नाही, ते शहांनी ६० दिवसांत करून दाखवले’, इथपासून ‘काश्मिरात दल लेकसमोर टू बीएचके, थ्री बीएचके फ्लॅटचे बुकिंग सुरू’, ‘रणजी सामन्यांसाठी आणखी एक संघ मिळाला...’ असे एकाहून एक भन्नाट मेसेज, फोटो मेसेजनी सोमवारी धमाल उडवून दिली. फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवर सकाळी ११ वाजल्यापासून काश्मीरशी संबंधित मेसेजचा पूरच आला.अमरनाथ यात्रा थांबवून सर्व पर्यटकांना राज्याबाहेर पाठविण्याच्या हालचाली सुरू झाल्या तेव्हाच काश्मिरात काही तरी घडणार अशी चर्चा सुरू झाली. रविवारी सायंकाळपर्यंत टिष्ट्वटरवर काश्मीरचा मुद्दा ट्रेंडिंगवर आला. सोमवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनी विभाजनासह कलम ३७० रद्द करण्याचा प्रस्ताव मांडताच सर्वच माध्यमांत चर्चेला ऊत आले. ‘काश्मीर पर फायनल फाइट’, ‘जम्मू अ‍ॅण्ड काश्मीर, वन कंट्री वन सिस्टीम’, ‘ऑपरेशन काश्मीर’, ‘ऑपरेशन ऑलआऊट’ अशा हॅशटॅगने टिष्ट्वटरवर लक्ष वेधण्यात येत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या कौतुकाच्या मेसेजेसनाही विनोदाची झालर होती. सरकारच्या अभिनंदनासोबतच विरोधातही मेसेजिंग सुरू होते. ‘रेड फॉर काश्मीर हॅशटॅग’ने काही लोकांनी या निर्णयाचा विरोध केला. व्हॉट्सअ‍ॅपचा डीपी लाल ठेवण्याची मोहीमही उघडण्यात आली. तिकडे पाकिस्तानी कलाकारांनीही या मुद्द्यावर नाक खुपसत टीकाटिप्पणी केली. ‘स्टँड विथ काश्मीर’, ‘काश्मीर अंडर थ्रेट’, ‘काश्मीर ब्लीड्स’ असे हॅशटॅग पाकिस्तानी कलाकार वापरत होते. वीणा मलिक, माहिरा खान वगैरे कलाकारांनी टिष्ट्वट केले. यावर भारतीय पाठिराख्यांनी त्यांना चांगलेच खडसावले.

टॅग्स :Amit Shahअमित शहाJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Narendra Modiनरेंद्र मोदी