जांबुवंतराव धोटे अनंतात विलीन

By Admin | Updated: February 20, 2017 03:51 IST2017-02-20T03:51:51+5:302017-02-20T03:51:51+5:30

‘वारे शेर आया शेर’, ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, ’एकच वीर परमवीर...’ अशा घोषणांसह माजी खासदार जांबुवंतराव

Jambuwantrao Dhaute merged with Ananta | जांबुवंतराव धोटे अनंतात विलीन

जांबुवंतराव धोटे अनंतात विलीन

यवतमाळ : ‘वारे शेर आया शेर’, ‘वेगळा विदर्भ झालाच पाहिजे’, ’एकच वीर परमवीर...’ अशा घोषणांसह माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांना रविवारी अखेरचा निरोप देण्यात आला. पिंप्री येथील शेतात पत्नी माजी आमदार विजयाताई धोटे, मुली क्रांती आणि ज्वाला यांनी त्यांच्या पार्थिवाला मूठमाती दिली.
कट्टर विदर्भवादी, फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे हृदयाघाताने निधन झाले. रविवारी सकाळी ११ वाजता ‘जय विदर्भ’ असे लिहिलेल्या वाहनातून त्यांची अंत्ययात्रा निघाली.
पालकमंत्री मदन येरावार, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, वर्ध्याचे खासदार रामदास तडस, नांदेडचे आमदार हेमंत पाटील, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी श्रद्धांजली अर्पण केली.

Web Title: Jambuwantrao Dhaute merged with Ananta