जालन्यात पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त

By Admin | Updated: August 28, 2015 01:51 IST2015-08-28T01:51:26+5:302015-08-28T01:51:26+5:30

बदनापूर पोलिसांनी जालना शहराजवळ दोन ठिकाणी छापे टाकून १ कोटी ८० लाख रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा

Jalna seized gutkha worth 2 crores | जालन्यात पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त

जालन्यात पावणे दोन कोटींचा गुटखा जप्त

जालना : बदनापूर पोलिसांनी जालना शहराजवळ दोन ठिकाणी छापे टाकून १ कोटी ८० लाख रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई बुधवारी रात्री उशिरा व गुरुवारी सकाळी करण्यात आली. या प्रकरणात मुख्य सूत्रधार सतीश राजेंद्र अग्रवाल याच्यासह चार जणांना अटक करण्यात आली. चौघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मंगळवारी रात्री उशिरा बदनापूरजवळ पोलिसांनी एका टेम्पोमधून ६ लाखांचा गुटखा जप्त केला होता. या वेळी आसेफ कय्युम शेख (रा. बायजीपुरा औरंगाबाद) याला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनंतर शेख अय्युब याला ताब्यात घेण्यात आले. अय्युबने दिलेल्या माहितीनुसार, जालना-जामवाडी रस्त्यावरील झी ढाब्याजवळ एका गोदामावर बुधवारी रात्री उशिरा बदनापूर पोलिसांनी छापा टाकला. यात सुमारे १ कोटी ८० लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.

Web Title: Jalna seized gutkha worth 2 crores