जळगावकर धावले मधुमेहासाठी
By Admin | Updated: November 13, 2016 14:23 IST2016-11-13T14:23:25+5:302016-11-13T14:23:25+5:30
जागतिक मधुमेह दिनानिमित्त जळगाव रनर्स ग्रुपतर्फे रन फॉर डायबेटीस या उपक्रमाचे आयोजन आज करण्यात आले.

जळगावकर धावले मधुमेहासाठी
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. १३ - जागतिक मधुमेह दिनानिमित्त जळगाव रनर्स ग्रुपतर्फे रन फॉर डायबेटीस या उपक्रमाचे आयोजन आज करण्यात आले. यात जळगाव पोलीस चे अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनीही सहभाग घेतला. जगात त्यातही भारतात मधुमेही रुग्णांची संख्या चिंताजनक वाढत आहे. या आजाराच्या वाढत्या प्रमाणाबद्दल समाजात जनजागृती करण्यात आली.
भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटाचे विकार, वजन वाढणे या समस्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करून सामाजिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रत्येक महिन्यात एका रविवारी एक विषय घेऊन सिटी रन या उपक्रमाचे आयोजन करण्याचे जळगाव रनर्स ग्रुपने ठरविले आहे.
दररोज व्यायामामुळे तसेच धावण्यामुळे शाररिक कार्यक्षमता वाढते. उदा. पँक्रियाज या ग्रंथीची क्षमता वाढून नैसर्गिक रित्या इन्सुलीन वाढण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात येण्यास मदत होते. रक्तदाब, वाढलेले वजन आटोक्यात येते.
सकाळी ६:३० वा.सिटी रनला काव्यरत्नावली चौकातून सुरुवात झाली. तत्पूर्वी वॉर्म अप १५ मिनिटे अगोदर शाररिक व्यायाम करण्यात आले व रन नंतर स्ट्रेचिंग घेण्यात आली. विशेष म्हणजे ८४ वर्षाचे मानकचंद तोतला यांनी पूर्ण रन करून एक चांगला संदेश दिला की रनिंग साठी कुठल्याही वयाचे बंधन नसते. जळगाव सुधृढ करण्याच्या कामात रनर्स ग्रुपचे ८० जणांनी उत्स्फूर्त सहभाग. रन फॉर डायबेटीस हा उपक्रम यशस्वी केला.