शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पक एक्स्प्रेसमधील मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यांदेखत पाहिला, बचावलेल्या प्रवाशांनी कथन केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 06:14 IST

Jalgaon Train Accident:

कल्याण : मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस दुर्घटनेत १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मात्र, नेमकी घटना कशी घडली, याची माहिती जेव्हा पुष्पक एक्स्प्रेस कल्याण स्थानकात आली तेव्हाच कळली. या अपघातातून बचावलेल्या प्रवाशांनी सांगितले की, मृत्यूचा थरार आम्ही डोळ्यादेखत पाहिला. त्यावेळी काळजाचे पाणी पाणी होत होते. भीतीपोटी प्रवासी मृत्युमुखी पडले. आम्ही बचावलो हे आमचे भाग्य समजतो.

प्रवासी नितीन गायकवाड यांनी सांगितले की, गाडीने जळगाव सोडले. आमचे काही सहकारी हे दुसऱ्या बोगीत होते. त्यांनी आम्हाला फोन केला की, गाडीला आग लागली आहे. मात्र, गाडीला आग लागलेली नव्हती. कोणीतरी चालत्या गाडीची चेन खेचली. चेन खेचणाऱ्याला वाटले की, गाडीला आग लागली.  चेन खेचल्याने गाडीच्या चाकांचे रुळावर घर्षण झाले. त्यातून ठिणग्या उडाल्या. या ठिणग्या पाहूनच भीतीपोटी प्रवाशांनी उड्या मारल्या. मृत प्रवाशांपैकी दोन प्रवाशांचे मृतदेह चाकात अडकल्याचे त्यांनी सांगितले. 

बातमी बघाताच फोनाफोनी सुरू प्रवासी संदीप जाधव यांनी सांगितले की, ते त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बुद्धगया येथे गेले होते. परतीचा प्रवास करताना त्यांनी लखनऊ रेल्वेस्थानकातून पुष्पक एक्स्प्रेस पकडली. 

अपघाताची बातमी टीव्हीवर दिसताच घरातून आम्हाला फोन सुरू झाले. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी फोनवरून माझ्याकडे घडल्या प्रकाराची विचारणा करून घटनेविषयी माहिती घेतली. याच गाडीने आम्ही रात्री पावणेबारा वाजता कल्याण स्थानकात सुखरूप पोहोचलो.

भिवंडीतील चौघांचा मृत्यूभिवंडी : पुष्पक एक्स्प्रेसच्या अपघातात भिवंडीतील जयगडी व विश्वकर्मा या दोन नेपाळी कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. जयकला जयगडी (६०), नन्ना विश्वकर्मा (५५), त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा (४५) व मुलगा हेमंत विश्वकर्मा (११) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही कुटुंबांतील नऊ सदस्य पुष्पक एक्स्प्रेसमधून भिवंडीकडे येत होते. 

जयकला या मूळच्या नेपाळमधील असून, त्यांचा मुलगा भिवंडीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. जयकला या भिवंडीत नातवंडांना प्रथमच भेटण्यासाठी व उपचारासाठी येत होत्या. जयकला यांनी अपघात होण्याच्या एक तास आधी नातवंडांसोबत व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला होता. दुसरीकडे, याच कुटुंबाचे नातेवाईक असलेले नेपाळ येथील कुच्ची कलिकास्थानमधील नन्ना विश्वकर्मा पुण्यात एका कंपनीत काम करीत होते. त्यांची पत्नी मैश्रा विश्वकर्मा या आजारी असल्याने त्यांनाही उपचारासाठी ते गावाहून मुलगा हेमंत व इतर तीन जणांसह येत होते. अपघातात नन्ना, मैश्रा व हेमंत यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :JalgaonजळगावIndian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात