शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव: केमिकल कंपनीत भीषण स्फोट, 8 गंभीर; संतप्त नागरिकांची दगडफेक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 00:04 IST

औद्योगिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समध्ये रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याने सुमारे ८ कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

जळगाव : औद्योगिक वसाहतमधील गितांजली केमिकल्समध्ये रविवारी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास भीषण स्फोट झाल्याने सुमारे ८ कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. स्फोट एवढा भीषण होता की औद्योगिक वसाहतीचा सुमारे २ कि.मी.चा परिसर हादरला. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी कंपनीवर जोरदार दगडफेक केली.  गितांजली केमिकल्स ही रसायन निर्मितीची कंपनी आहे. रात्रपाळी सुरु असताना रात्री बॉयलरमध्ये भीषण स्फोट झाला, त्यात यावेळी कंपनीत कार्यरत असलेले कर्मचारी धनराज ढाके, राजेंद्र उत्तम शिरसाळे, दिनेश शिवशंकर, गणेश साळी, संदीप बोरसे, नीलेश कोळी, ज्ञानेश्वर उखर्डू पाटील, योगेश प्रकाश नारखेडे हे आठ जण जखमी झाले. आजूबाजूच्या  कंपन्यांमधील कर्मचा-यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना  जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले व तेथे तत्काळ उपचार करण्यात आले. जिल्हा रुग्णालयासह जामनेर येथे आरोग्य शिबिरासाठी आलेल्या मुंबईच्या पथकानेही जखमींवर तातडीचे उपचार केले. घटना घडल्यानंतर कंपनीतील वीज पुरवठा खंडित झाल्याने या कंपनी परिसरात सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे कंपनीत नेमके किती कर्मचारी अडकले आहेत, याची माहिती रात्री ११.३० पर्यंत मिळाली नव्हती. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनेनंतर दीड तासानंतर घटनास्थळी पोहचले व शोध मोहिमेस प्रारंभ झाला. स्फोटामुळे रसायन सर्वत्र उडाल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शोध कार्यात अडथळा येत होता. परिसरातील कॉलन्यांमधील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. दिवाळीतही याच कंपनीत स्फोट झाल्याने दोन तरुण कर्मचारी ठार झाले होते. त्यापूर्वी २००६ मध्ये झालेल्या स्फोटात ३ कर्मचारी ठार झाले होते, अशी माहिती कामगारांनी दिली.

टॅग्स :fireआगJalgaonजळगावBlastस्फोट