जळगाव - काळ्याबाजारात जाणारा शालेय पोषण आहाराचा लाखोंचा माल पकडला
By Admin | Updated: August 11, 2016 16:02 IST2016-08-11T16:02:13+5:302016-08-11T16:02:13+5:30
शालेय पोषण आहाराचा तांदूळ भरलेला ट्रक काळ्या बाजारात घेवून जात असताना सुशील मगरे या पोलीस कर्मचाऱ्याने जीवावर उदार होत पाठलाग करीत पकडला.

जळगाव - काळ्याबाजारात जाणारा शालेय पोषण आहाराचा लाखोंचा माल पकडला
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. 11 - शालेय पोषण आहाराचा तांदूळ भरलेला ट्रक काळ्या बाजारात घेवून जात असताना सुशील मगरे या पोलीस कर्मचाऱ्याने जीवावर उदार होत पाठलाग करीत पकडला. वावडदा ते म्हसावद दरम्यान बुधवारी मध्यरात्री सिनेस्टाईल हा थरार सुरु होता. या ट्रकमध्ये लाखो रुपयाचे धान्य आहे. या कारवाईमुळे रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शालेय पोषण आहाराचा तांदूळ हा पाथरी (ता.जळगाव) येथून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या म्हसावद दूरक्षेत्राचे कर्मचारी सुशील मगरे यांना मिळाली होती. त्यानुसार मगरे यांनी वावडदा चौकात थांबून सापळा लावला. हा ट्रक (क्र.एम.एच.१८ एम.२६११) वावडदा चौकात रात्री अकरा वाजता आला असता मगरे यांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने तेथे न थांबता मगरे यांना कट मारुन ट्रक म्हसावदच्या दिशेने वेगाने नेला. पुढे तो पकडला. यात लाखो रुपयांचा माल आहे. त्याचा पंचनामा पोलिसांकडून सुरु आहे.