शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Jalgaon, Sangli Election Results Live : भाजपकडून जळगावचा किल्ला सर, आता सांगलीतही काँग्रेस-राष्ट्रवादीला घरघर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2018 17:16 IST

जळगाव, सांगली महापालिका निकालातही भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. जळगावसह सांगली महापालिकेतही भाजपचे कमळ खुलल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. जळगावमध्ये भाजपला 57 जागांवर तर सांगलीत 41 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन होणार आहे.

सांगली/जळगाव - जळगाव, सांगली महापालिका निकालातही भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. जळगावसह सांगली महापालिकेतही भाजपचे कमळ खुलल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. जळगावमध्ये भाजपला 57 जागांवर तर सांगलीत 41 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेत भाजपची सत्ता स्थापन होणार आहे.

सांगली-मिरज-कुपवाड आणि जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला शुक्रवारी (3 ऑगस्ट) सकाळी दहा वाजता सुरुवात झाली आहे.

जळगाव महानगरपालिकेवर भाजपाचे कमळ फुलणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मनपाच्या 75 जागांसाठी 303 उमेदवार रिंगणात असून या सर्व उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला होणार आहे.

सांगली महापालिकेच्या 20 प्रभागातील 78 जागांसाठी बुधवारी 62.15 टक्के मतदान झाले. 451 उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या प्रमुख चार पक्षांसह स्थानिक आघाड्या व अपक्षांनी गेले महिनाभर प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. 

Live Updates :

- जळगावात 75 पैकी 57 जागांवर भाजपा वि़जयी

- सांगली : प्रभाग वीसमध्ये पराभूत उमेदवार विवेक कांबळे यांच्या मागणीनुसार फेरमतमोजणी सुरू

- सांगली : मिरजेत प्रभाग वीसमध्ये राष्ट्रवादीचे योगेंद्र थोरात केवळ सात मतांनी विजयी, भाजपचे विवेक कांबळे पराभूत

-  दुपारी 3.15 चं चित्र

सांगली निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
काँग्रेस102
राष्ट्रवादी काँग्रेस132
भाजपा324
शिवसेना--
स्वाभिमानी आघाडी1-

- सांगली महापालिकेत भाजपाने बहुमताचा आकडा गाठला

- सांगली : भाजपाची बहुमताकडे वाटचाल, सुरुवातीच्या पिछाडीनंतर भाजपाचे जोरदार पुनरागमन

- जळगाव : जळगाववर भाजपाचा झेंडा, भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

-  दुपारी 2.35 चं चित्र

सांगली निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
काँग्रेस102
राष्ट्रवादी काँग्रेस105
भाजपा274
शिवसेना--
स्वाभिमानी आघाडी1-

- सांगली : भाजपची जोरदार मुसंडी

- दुपारी 2.00 चं चित्र

सांगली निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
काँग्रेस92
राष्ट्रवादी काँग्रेस105
भाजपा2110
शिवसेना--
स्वाभिमानी आघाडी1-

- दुपारी 1.25  चं चित्र

जळगाव निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
भाजपा-57
शिवसेना-15
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेस--
समाजवादी पार्टी--
एमआयएम -3
अपक्ष--

- जळगाव : एमआयएमचे तीनही उमेदवार विजयी

- जळगाव : जळगाववर भाजपाचा झेंडा, शिवसेनेच्या सुरेशदादा जैन यांना मोठा धक्का

- सकाळी 12.55  चं चित्र

जळगाव निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
भाजपा-59
शिवसेना-14
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेस--
समाजवादी पार्टी--
एमआयएम -3
अपक्ष-1

- सकाळी 12.50  चं चित्र

सांगली निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
काँग्रेस72
राष्ट्रवादी काँग्रेस81
भाजपा124
शिवसेना--
स्वाभिमानी आघाडी1-

- सांगली : माजी महापौर काँग्रेसचे नेते किशोर जामदार पराभूत

- जळगावात भाजपा कार्यालयात जल्लोष, माजी आ.गुरुमुख जगवानी, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, किशोर काळकरांनी कार्यकर्त्यांसोबत धरला ठेका

- जळगाव : बहुमतापेक्षा अधिक जागांवर (५७ जागा) भाजपा आघाडीवर आहे. यातील काही जागांवर आघाडी कमी झाली तरी बहुमतासाठी लागणाऱ्या ३८ जागा सहज मिळू शकतात, या आशेने भाजपामध्ये उत्साह

- जळगाव : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विकासाच्या आश्वासनावर विश्वास ठेवल्याचे चित्र

- सकाळी 12.15  चं चित्र

सांगली निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
काँग्रेस62
राष्ट्रवादी काँग्रेस71
भाजपा82
शिवसेना--
स्वाभिमानी आघाडी1-

- सांगली : राष्ट्रवादीचे दिग्गज नेते धनपाल खोत यांचा पराभव. उपमहापौर व स्वाभिमानीचे विजय घाडगे विजयी.

- सांगली : प्रभाग 6 ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नरगिस सय्यद विजयी

- सांगली : प्रभाग 6 अ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे मैनुद्दीन बागवान विजयी

- जळगाव : प्रभाग क्रमांक १३ ड मधील शिवसेनेच्या उमेदवार संगीता नितीन बरडे एक हजार मतांनी पराभूत

- सकाळी 11.52  चं चित्र

जळगाव निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
भाजपा-57
शिवसेना-14
राष्ट्रवादी काँग्रेस--
काँग्रेस--
समाजवादी पार्टी--
एमआयएम -3
अपक्ष-1

- प्रभाग क्रमांक १५ अ मध्ये शिवसेनेचे सुनील महाजन व ब मधून शिवसेनेच्या जयश्री महाजन २ हजार मतांनी आघाडीवर आहे.  भाजपाचे अशोक लाडवंजारी पिछाडीवर

- सकाळी 11.40  चं चित्र...

जळगाव निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
काँग्रेस--
राष्ट्रवादी काँग्रेस--
भाजपा-30
शिवसेना322
समाजवादी पार्टी-1
एमआयएम -3
अपक्ष-1

- जळगाव : भाजप 11, शिवसेना 7 जागी आघाडीवर

- सकाळी 11.20 चं चित्र...

सांगली निवडणूक निकाल
राजकीय पक्षविजयआघाडी
काँग्रेस52
राष्ट्रवादी काँग्रेस33
भाजपा42
शिवसेना--
स्वाभिमानी आघाडी1-

- जळगाव : शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या पत्नी लता सोनवणे तसेच सेनेच्या जिजाबाई भापसे व गणेश सोनवणे विजयी

- सांगली : प्रभाग 15 चा निकाल जाहीर, काँग्रेस 3 तर राष्ट्रवादी 1 जागी विजयी

- सांगली : भाजपा 7, काँग्रेस 6, राष्ट्रवादी 5, अपक्ष 1 जागा

- सांगली : भाजपा 6, काँग्रेस 5, राष्ट्रवादी 5, अपक्ष 1 जागा

- जळगाव प्रभाग क्रमांक 15 अ व ब मधून शिवसेनेचे दोन्ही उमेदवार आघाडीवर

- जळगावमध्ये भाजप 8 तर शिवसेना 4 जागी आघाडीवर

- जळगाव : प्रभाग क्रमांक 13 मध्ये भाजपाचे सुरेखा तायडे, ज्योती चव्हाण, जितेंद्र मराठे, अंजनाबाई सोनवणे हे चारही उमेदवार आघाडीवर

- जळगाव : अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नसल्याने मतमोजणी केंद्राबाहेर पत्रकारांची निदर्शनं

- जळगाव : पत्रकारांनी केला निवडणूक अधिकाऱ्यांचा निषेध

- सांगली : भाजप 7, काँग्रेस 4, राष्ट्रवादी 4, अपक्ष 1 जागा

- जळगाव : मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी मतमोजणी ठिकाणी पत्रकारांना प्रवेश नाकारला. मीडिया कक्षातून टीव्ही पहा आणि रिपोर्टींग करा अशा सूचना

- जळगावमध्ये भाजपा 3 तर शिवसेना 2 जागी आघाडीवर

- सांगलीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 उमेदवार आघाडीवर तर भाजपाचे ६ उमेदवार आघाडीवर

- जळगाव : पत्रकारांना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी  प्रवेश न दिल्याने गोंधळ.

-  प्रभाग क्रमांत 16 मध्ये शिवसेनेच्या साधना श्रीश्रीमाळ आघाडीवर

- जळगाव : भाजपाला 3 आणि शिवसेनेला 2 जागांवर आघाडी

- सांगली : भाजपा 6, काँग्रेस 5 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर आघाडी

- सांगलीत काँग्रेस 6, भाजपा एका ठिकाणी आघाडीवर

- जळगाव महापालिकेचा पहिला कल हाती, प्रभाग - 1 : भाजपा 2, शिवसेना 2 जागी आघाडीवर

 - सांगली महापालिकेचा पहिला कल हाती, काँग्रेसला 3 तर भाजपाला एका ठिकाणी आघाडी

- जळगाव : महानगरपालिका मतमोजणीला सुरुवात, पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात

-  सांगली : पहिल्या फेरीत 12, 9, 15, 1, 6, 3 प्रभागाची मतमोजणी सुरू

- सांगली : टपाली मतदानाची मोजणी सुरू, मतमोजणी केंद्रावर गर्दी

- जळगाव : मतमोजणीस्थळी तगडा बंदोबस्त

- जळगाव : काही क्षणात टपाली मतमोजणीला होणार सुरूवात.

- जळगाव : मनपा निवडणूक मतमोजणीसाठी कर्मचारी सज्ज, दहा मिनिटात मतमोजणीस प्रारंभ  होणार

- जळगाव : दुपारी 2  वाजेपर्यंत मतमोजणी आटोपणार असा अंदाज मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत डांगे यांनी व्यक्त केला आहे.

- सांगली : ज्या प्रभागात पोस्टल मतपत्रिका आल्या आहेत, त्या मतपत्रिका आधी मोजण्यात येणार आहेत. नंतर मग एक-एक इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र खुले केले जाणार.

-  सांगली : मतमोजणीसाठी बारा टेबल असून 334 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- सांगली : सांगली-मिरज रस्त्यावरील शासकीय गोदामात मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार

- जळगाव : प्रत्येक प्रभागासाठी दोन टेबल याप्रमाणे 38 टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाचवेळी सर्व १९ प्रभागांची मतमोजणी

- जळगाव : सुरुवातीला टपाली मतदानाच्या मतमोजणीस सुरुवात होणार

- जळगाव : मतमोजणीसाठी स्वतंत्र टीम तयार करण्यात आली असून प्रभागनिहाय मतमोजणीस सुरुवात होणार 

- सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस प्रारंभ होणार

 

टॅग्स :ElectionनिवडणूकSangli Electionसांगली महानगरपालिका निवडणूकJalgaon Electionजळगाव महानगरपालिका निवडणूक