रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये जळगावात गोंधळ
By Admin | Updated: December 17, 2015 00:39 IST2015-12-17T00:39:33+5:302015-12-17T00:39:33+5:30
कोकणात सहलीला जाणाऱ्या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने, जागेअभावी झालेल्या वादामुळे वाराणसी-रत्नागिरी
रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये जळगावात गोंधळ
जळगाव : कोकणात सहलीला जाणाऱ्या काशीनाथ पलोड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवासी बसल्याने, जागेअभावी झालेल्या वादामुळे वाराणसी-रत्नागिरी एक्स्प्रेस ही गाडी, संतप्त पालकांनी बुधवारी जळगाव स्थानकावर रोखून धरली. त्यामुळे गाडीचा २८ मिनिटे खोळंबा झाला.
येथील ७० विद्यार्थ्यांचे कोकणात सहलीसाठी रत्नागिरी एक्स्प्रेसमध्ये आरक्षण करण्यात आले होते. मात्र, आरक्षित आसनांवर दुसरेच प्रवासी बसलेले होते. विद्यार्थ्यांना गाडीत चढण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. त्यामुळे पालक संतप्त झाले. पालकांनी तब्बल चार वेळा साखळी ओढून गाडी थांबवली.