जळगाव जिल्हाधिका:यांचे खाते सील करण्याचे आदेश
By Admin | Updated: November 27, 2014 01:45 IST2014-11-27T01:45:36+5:302014-11-27T01:45:36+5:30
दिवाणी न्यायाधीश व्ही.एस. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावाने असलेले कोषागार कार्यालयाचे बँक खाते सील करण्याचे आदेश बुधवारी दिले आहे.

जळगाव जिल्हाधिका:यांचे खाते सील करण्याचे आदेश
जळगाव : पाळधी बायपास रस्त्याच्या भूसंपादनाची 17 लाख 19 हजार 956 रुपयांची रक्कम शेतक:याला अदा न केल्याने दिवाणी न्यायाधीश व्ही.एस. पाटील यांनी जिल्हाधिकारी यांच्या नावाने असलेले कोषागार कार्यालयाचे बँक खाते सील करण्याचे आदेश बुधवारी दिले आहे.
पाळधी बायपास रस्त्याच्या कामासाठी 1993 मध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाने पाळधी येथील भिकचंद नंदलाल सोमाणी यांच्यासह 35 शेतक:यांच्या जमिनीचे भूसंपादन केले होते. त्या पैकी 6 जणांच्या जमिनीची रक्कम बाकी असल्याने भूसंपादनाचा मोबदला मिळावा यासाठी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. 2क्क्5 मध्ये न्यायालयाने सोमाणी यांना भूसंपादनाची 17 लाख 19 हजारांची रक्कम अदा करण्याचे आदेश दिले होते. आदेशाच्या विरोधात सोमाणी यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाने औरंगाबाद उच्च न्यायालयात अपिल केले. तेथेही हा निर्णय कायम ठेवला होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने कार्यकारी अभियंता उत्तर विभाग यांच्या विरोधात वेळोवेळी वॉरंट काढून रक्कम भरण्याबाबतच्या सूचना केली होती. तक्रारदार सोमाणी यांनी 2क् ऑक्टोबरला जिल्हाधिका:यांचे बँक खाते सील करावे या आशयाचा अर्ज दिला होता. त्यानंतर न्यायालयाने जिल्हा कोषागार अधिकारी यांच्याकडे बँकेच्या खात्यातील रकमेचे वर्गीकरण मागितले होते. त्यावेळी खात्यावर 11 कोटी 7क् लाख 39 हजार शिल्लक असल्याचे स्पष्ट झाले. या रकमेतून सोमाणी यांना त्यांच्या भूसंपादनाची रक्कम अदा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. मात्र त्यानंतरही सोमाणी यांना ही रक्कम न मिळाल्याने त्यांनी 21 नोव्हेंबर रोजी न्यायालयात पुन्हा अर्ज केला. (प्रतिनिधी)