शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

गावठी पिस्तूल हवेत, तर या जळगावला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 03:15 IST

तस्करीचे केंद्र; तब्बल १७६ पिस्तूल जप्त

- सुनील पाटीलजळगाव  : जळगाव जिल्हा हा गावठी पिस्तूल तस्करीचे मुख्य केंद्र बनला असून येथून महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यात पिस्तुलाची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले आहे. महामार्गाचे जाळे, मध्य रेल्वेचे माहेरघर असलेले भुसावळ, वाढती गुन्हेगारी व पिस्तूल निर्मितीचे उमर्टी हे ठिकाण जिल्ह्याला लागूनच असल्याने तस्करीचे जाळे विस्तारले आहे. पाच वर्षांत पोलिसांनी १७६ गावठी पिस्तूल व २२० काडतुसे जप्त केली असून २३२ आरोपींना अटक केली आहे. चोपडा तालुक्याच्या पायथ्याशी डोंगराळ वस्तीत उमर्टी नावाची दोन गावे वसलेली असून एक गाव जळगाव जिल्ह्यात तर दुसरे गाव मध्य प्रदेशात येते, दोन्ही गावांमध्ये जाण्यासाठी मध्ये फक्त एक नदी आहे. मध्य प्रदेशात येणाऱ्या उमर्टीत ठिकठिकाणी पिस्तुलांची निर्मिती केली जाते. पिस्तूल तयार करणाऱ्यांचे जिल्ह्यात दलाल व गुन्हेगारांशी थेट संपर्क असल्याने त्यांच्या माध्यमातून पुणे, मुंबईसह राज्यात व शेजारच्या गुजरातमध्ये पिस्तूल रवाना केले जातात. उमर्टी हे गाव मध्य प्रदेशात येत असले तरी त्याचा दैनंदिन व्यवहार हा जळगाव जिल्ह्यातच होतो. यावल-चोपडा या मार्गाने कार, दुचाकीने तर भुसावळ येथून रेल्वेने देशभरात पिस्तुलाची तस्करी होते. मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातूनही गावठी पिस्तुलाची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. जप्त केलेले आरोपींकडेच आढळून आले आहेत.वर्षनिहाय पकडलेले पिस्तूलवर्ष    आरोपी    पिस्तूल    काडतूस    २०१६    २५    १६    २५       २०१७    ३२    ३०    ३६       २०१८    १९    १७    २१      २०१९    ७१    ५४    ५७      २०२०    ८५    ५९    ८१ एकूण    २३२    १७६    २२०दहा हजारांपासून पिस्तूल उपलब्धदहा हजारांपासून ते ३० हजारांपर्यंत पिस्तूल मिळतात. उमर्टी गावात तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचेही प्रसंग आहेत.