जवखेडाचा अहवाल थेट न्यायालयात !
By Admin | Updated: November 20, 2014 04:05 IST2014-11-20T04:05:37+5:302014-11-20T04:05:37+5:30
जवखेडे हत्याकांडातील संशयितांच्या नार्को चाचणीच्या अनुषंगाने होणाऱ्या पूर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांनी मिळणार आहे.

जवखेडाचा अहवाल थेट न्यायालयात !
अहमदनगर : जवखेडे हत्याकांडातील संशयितांच्या नार्को चाचणीच्या अनुषंगाने होणाऱ्या पूर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांनी मिळणार आहे. या चाचण्यांचा सीलबंद अहवाल तपासी अधिकाऱ्यांमार्फत थेट न्यायालयाला सादर करण्यात येणार आहे. २४ आणि २५ नोव्हेंबरला नार्को चाचणीतील शेवटच्या चाचण्या पूर्ण होणार आहेत.
पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे दलित कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती. राज्यातील राजकीय पक्षांचे नेते, आजी-माजी मंत्री, दलित संघटनांच्या नेत्यांनी जवखेडे खालसा येथे भेट देऊन पोलिसांनी जलदगतीने तपास करावा, अशी मागणी केली. पोलिसांच्या तपासावर तसेच राज्य सरकारवर टिकेची झोडही उठविली गेली. आरोपींना अटक करण्याइतपत सबळ पुरावा न सापडल्याने पोलीसही हतबल झाले. शेवटी नार्को चाचणी करण्याची पोलिसांनी न्यायालयाकडे परवानगी मागितली. पोलिसांनी सहा संशयितांना चाचणीसाठी नेले होते.