जेटली यांना खराब हवामानाचा फटका
By Admin | Updated: July 4, 2016 15:02 IST2016-07-04T14:57:52+5:302016-07-04T15:02:02+5:30
दिल्लीवरून रायपूरला जाणा-या केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या चार्टर्ड विमानाला दृश्यतेच्या कारणामुळे विमानतळ वाहतूक नियंत्रण कक्षाकडून (एटीएस) परवानगी मिळाली नाही.

जेटली यांना खराब हवामानाचा फटका
>- नागपूर विमानतळावर ३० मिनिटे अडकले
नागपूर, दि.४ - दिल्लीवरून रायपूरला जाणा-या केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या चार्टर्ड विमानाला दृश्यतेच्या कारणामुळे विमानतळ वाहतूक नियंत्रण कक्षाकडून (एटीएस) परवानगी न मिळाल्यामुळे सकाळी ११.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आकस्मिक उतरवावे लागले. जेटली ३० मिनिटे विमानतळावरील विशेष कक्षात थांबले होते. रायपूर येथे मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे तेथील विमानतळावर दृश्यता कमी होती. खराब हवामानाचा जेटली यांना फटका बसला. थोड्याच वेळात एटीएसकडून परवानगी मिळाल्यानंतर विमानाने दुपारी १२ वाजता रायपूरकडे उड्डाण भरले.