जैतापूरमुळे कोकणाचा कोळसा होऊ द्यायचा नाही
By Admin | Updated: December 11, 2014 01:30 IST2014-12-11T01:30:35+5:302014-12-11T01:30:35+5:30
जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. आम्हाला कोकणाचा कोळसा होऊ द्यायचा नाही. कोकणातील माणसाचा रोजगार पर्यटनातून आहे.

जैतापूरमुळे कोकणाचा कोळसा होऊ द्यायचा नाही
प्रश्न - जैतापूर प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका कायम आहे का?
कदम - जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम आहे. आम्हाला कोकणाचा कोळसा होऊ द्यायचा नाही. कोकणातील माणसाचा रोजगार पर्यटनातून आहे. कोकणाचा कॅलिफोर्निया करण्याची भाषा एकीकडे करायची आणि दुसरीकडे जैतापूरसारखे प्रकल्प कोकणी माणसाच्या माथ्यावर मारायचे व कोकणाची स्मशानभूमी करायची, हे चालणार नाही. भाजपा व शिवसेनेच्या भूमिका अनेक विषयांवर परस्पर विरोधी राहिल्या आहेत. आतार्पयत राज्यात एक लाख मे.व्ॉ. वीजनिर्मिती होईल एवढे प्रकल्प मंजूर झाले आहेत. असे असताना जैतापूरचा आग्रह कशाला हवा?
प्रश्न - सागरी महामार्गाच्या घोषणा सातत्याने केल्या गेल्या, त्याचे काय?
कदम - सागरी महामार्ग प्रकल्प मंजूर करून त्याची अंमलबजावणी करण्यास आपण तातडीने प्राधान्य देणार आहोत. आतार्पयत या प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले असले तरी, आपण सागरी महामार्गाच्या अंमलबजावणीस कटिबद्ध आहोत.
प्रश्न - चिपळूणमधील लोटे परशुराम येथील कारखान्यांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण केले जाते. पर्यावरणमंत्री या नात्याने आपण त्याची कशी दखल घेणार?
कदम - लोटे परशुराम येथील प्रदूषणकारी 18 कारखान्यांना पर्यावरण खात्याची धुरा हाती घेताच नोटीस काढण्याचे आदेश आपण दिले आहेत. अनेक कारखाने प्रदूषणकारी पाणी, रसायने पाण्यात सोडून देतात. त्यांनी प्रक्रिया करून ते सोडले पाहिजे. प्रक्रिया करणारे प्लांट बसवणो खर्चिक असल्याचा दावा कारखाने करतात; मात्र ते मान्य केले जाणार नाही.
प्रश्न - लवासा प्रकल्पामुळे पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारी आहेत. त्याची दखल कशी घेणार?
कदम - लवासा प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काय मत आहे, ते आपल्याला पाहावे लागेल. त्यांनी सर्व परवानगी घेऊन काम केले असेल तर विरोधाकरिता विरोध करता येणार नाही. राजकीय सूडापोटी कुणावरही कारवाई होता कामा नये.