शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: बच्चू कडूंचा पक्ष शिंदेच्या शिवसेनेत विलीन होणार?, थोड्याच वेळात भूमिका स्पष्ट करणार
3
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
4
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
5
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
6
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
7
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
8
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
9
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
10
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
11
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
12
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
13
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
14
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
15
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
16
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
17
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
18
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
19
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
20
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

जैतापूर होणारच

By admin | Updated: April 8, 2015 02:50 IST

जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणारच, अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली

मुंबई : जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणारच, अशी ग्वाही महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली. याबाबत शिवसेनेचे काही वेगळे मत असल्यास तो प्रश्न समन्वयाने सोडवू, असेही खडसे म्हणाले. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावरून आज विधान परिषदेत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. सरकारमधील घटक पक्षानेच जैतापूर प्रकल्पाच्या विरोधात मोर्चा काढला होता. या विषयावर सरकारमध्ये मतभिन्नता असल्याने हा प्रकल्प कसा पूर्ण होणार, असा प्रश्न जयंतराव जाधव यांनी विचारला होता. त्यावर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, की या विषयावर सरकारमध्ये मतभेद नाहीत. या प्रकल्पाकरिता लागणारी ९३८ हेक्टर जमीन २,३३६ शेतकऱ्यांकडून संपादित केली. या प्रकल्पाकरिता जमीन संपादित करून देणे हीच केवळ राज्य सरकारची जबाबदारी असून, प्रकल्प कधी सुरू करायचा हा सर्वस्वी केंद्र सरकारचा निर्णय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रान्स  भेटीत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली असली तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विरोध असल्याचे त्यांनी जाहीर केले असून, शिवसेनेच्या दोन आमदारांनी अलीकडे मोर्चा काढला होता, याकडे सुनील तटकरे यांनी लक्ष वेधले. राज्यपालांच्या अभिभाषणात जैतापूर प्रकल्प पूर्ण करण्यात सरकारचा मोठा सहभाग असेल, असे नमूद केले असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. विरोधी बाकांवरून होत असलेला प्रश्नांचा भडिमार पाहून महसूलमंत्री खडसे हे बावनकुळे यांच्या मदतीला धावून गेले. संपूर्ण देशाला वीजपुरवठा करण्याकरिता उभारण्यात येणारा हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे ही राज्याची भूमिका आहे, असे सांगत जेव्हा स्वतंत्र पक्ष असतात तेव्हा काही विषयांवर वेगळी भूमिका असते, असा टोला खडसे यांनी लगावला. राज्याच्या पर्यावरणमंत्र्यांनी जैतापूरला पर्यावरणाची मान्यता दिली जाणार नाही, असे निवेदन सभागृहात दिल्याचे आपल्या ऐकीवात नाही, असेही खडसे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)