जैतापूर पंचक्रोशीतला सौर उर्जेवरील पहिल्या घराचा प्रयोग यशस्वी
By Admin | Updated: January 11, 2016 16:15 IST2016-01-11T14:01:54+5:302016-01-11T16:15:47+5:30
प्रस्तावित अणुप्रकल्पामुळे चर्चेत असलेल्या जैतापूरमधल्या एका घराला सौर उर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येत असून पंचक्रोशीतील हा पहिला यशस्वी प्रयोग मानण्यात येत आहे.

जैतापूर पंचक्रोशीतला सौर उर्जेवरील पहिल्या घराचा प्रयोग यशस्वी
सचिन नारकर
जैतापूर, दि. ११ - प्रस्तावित अणुप्रकल्पामुळे चर्चेत असलेल्या जैतापूरमधल्या एका घराला सौर उर्जेद्वारे वीजपुरवठा करण्यात येत असून पंचक्रोशीतील हा पहिला यशस्वी प्रयोग मानण्यात येत आहे.
आगरवाडी भागातील लक्ष्मी प्रसाद या विलास मांजरेकर यांच्या वास्तुला सोलर पॉवर पॅक युनिटने वीज पुरवठा करण्यात येत आहे. २५० वॅटची सहा पॅनल यासाठी बसवण्यात आली आहेत. संपूर्ण वास्तुचा २ KV पर्यंतचा भार घेण्याची या युनिटची क्षमता आहे. या घरातली सगळी विजेची उपकरणे सौरउर्जेवर चालवण्यात येत असून ही यंत्रणा बघण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
या यंत्रणेचा खर्च अडीच लाख रुपयांच्या आसपास असून, तिचे आयुर्मान २५ वर्षे असल्याचे ही यंत्रणा पुरवणा-या कंपनीने म्हटले आहे.