जैतापूर हा वैयक्तिक गर्वाचा प्रश्न करु नका
By Admin | Updated: April 22, 2015 04:08 IST2015-04-22T04:08:31+5:302015-04-22T04:08:31+5:30
कोकणातील अणुऊर्जा प्रकल्प हा वैयक्तिक गर्वाचा प्रश्न करु नका, महाराष्ट्राचे हित पाहूनच निर्णय घ्या, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांना लगावला़

जैतापूर हा वैयक्तिक गर्वाचा प्रश्न करु नका
मुंबई : कोकणातील अणुऊर्जा प्रकल्प हा वैयक्तिक गर्वाचा प्रश्न करु नका, महाराष्ट्राचे हित पाहूनच निर्णय घ्या, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडवणीस यांना लगावला़
शिवसेनेतर्फे मंगळवारी वांदे्र पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा विजयोत्सव साजरा करण्यात आला़ त्यावेळी ते बोलत होते़ ठाकरे म्हणालें, की जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प हा विषय केंद्र सारकारने किमान समान कार्यक्रमात समाविष्ट केला पाहिजे़ पंतप्रधान मोंदी यांनी अलिकडेच जर्मनीला भेट दिल़ी. तेव्हा तेथील राष्ट्राध्यक्षांनी अणुऊर्जा प्रकल्प किती धोकायक ठरु शकतात हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते़ असे असतानाही थोड्या फार विजेकरिता शंभर धोका महाराष्ट्राने का पत्कारायचा या भूमिकेवर आपण आजही ठाम आहोत़ अन्य ज्या राज्यांना हा प्रकल्प हवा असेल, त्यांनी तो घेऊन जावा, असे ते म्हणाले़
तर मुंबईच्या विकास आराखड्याबाबत शिवसेनेनेच सर्वप्रथम आवाज उठवला आणि सर्वसामान्य मुंबईकरांच्या भावनेला वाचा फोडली़ त्या विषयावर मुखयमंत्र्यांना पत्र लिहिले असून, आपली मते व्यक्त केली आहेत़़ त्यांची दखल नव्या सुधारित आराखड्यात घेतली जाईल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला़ (विशेष प्रतिनिधी)