जैन साध्वीवर हल्ला

By Admin | Updated: August 24, 2015 00:42 IST2015-08-24T00:42:21+5:302015-08-24T00:42:21+5:30

इतवारीत एका जैन साध्वीवर शनिवारी मध्यरात्री हल्ला झाल्यामुळे सर्वत्र तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे.

Jain Sadhvi attacked | जैन साध्वीवर हल्ला

जैन साध्वीवर हल्ला

नागपूर : इतवारीत एका जैन साध्वीवर शनिवारी मध्यरात्री हल्ला झाल्यामुळे सर्वत्र तीव्र संताप निर्माण झाला आहे. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. इतवारीतील सराफा बाजाराजवळ पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर आहे. बाजूलाच त्यागी भवन असून, तेथे संत, साध्वी विश्राम करतात. शनिवारी मध्यरात्री १२च्या सुमारास त्यागी भवनात दोन हल्लेखोर आले. त्यांनी जैन साध्वीना मारहाण करून पळ काढला. पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Jain Sadhvi attacked