कारागृहातील कैद्यांची तपासणी
By Admin | Updated: August 1, 2016 02:14 IST2016-08-01T02:14:38+5:302016-08-01T02:14:38+5:30
आॅर्थर रोड कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे.

कारागृहातील कैद्यांची तपासणी
मुंबई: आॅर्थर रोड कारागृहात सध्या क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णांना दाटीवाटीने राहावे लागते. याचा परिणाम कैद्यांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. संसर्गजन्य आजार कैद्यांना जडत असल्यामुळे त्यांच्यासाठी एका सामाजिक संस्थेने शनिवारी कारागृहात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते. या तपासणी शिबीरात हजारहून अधिक कैद्यांची तपासणी करण्यात आली.
कैद्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी योगासने महत्त्वाची आहेत. त्यामुळे शनिवारी कैद्यांना योगासनाचे प्रशिक्षण देण्यात आले. श्रीमद् राजचंद्र मिशन धरमपूर यांच्यातर्फे जेल सुप्रिडैंट हर्षद अहिराव आणि डॉ. प्रफुल बनसोड यांनी पुढाकार घेऊन या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
योगासनानंतर कैद्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी पाच डॉक्टरांचे पथक कारागृहात गेले होते. तपासणी करण्यात आलेल्या कैद्यांपैकी सुमारे ४०० ते ४५० कैद्यांना त्वचेचे आजार असल्याचे आढळून आले.
कारागृहाची क्षमता ८०० इतकी आहे. पण सध्या या कारागृहात २ हजार ७०० ते २ हजार ८०० कैदी आहेत. त्यामुळे कारागृहात गर्दी असते. पावसाळ््यात दमट हवामान असते. (प्रतिनिधी)