धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जेलभरो
By Admin | Updated: February 11, 2017 16:43 IST2017-02-11T16:43:15+5:302017-02-11T16:43:15+5:30
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन केले.

धनगर आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जेलभरो
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण मिळावे, या मागणीसाठी भारत अगेन्स्ट करप्शन संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी पाटील यांना अटक केली.
पाटील यांनी 19 फेब्रुवारीला जेलभरो आंदोलनाची हाक दिली होती. मात्र नियोजित वेळेआधीच आंदोलन करत त्यांनी पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी संघटनेच्या मागण्यांचे निवेदन वर्षावर पोहोचवले आहे.
यासंदर्भात पाटील यांनी सांगितले की, पुणे येथे केलेल्या उपोषणावेळी भाजपा नेत्यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. त्यानंतर पुन्हा आझाद मैदानात आंदोलन करावे लागले. तरी राज्य सरकार चालढकल करत असल्याने जेलभरो आंदोलन करावे लागले. यापुढेही सरकारने आंदोलनाची दखल घेतली नाही, तर हजारो कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल.