बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा

By Admin | Updated: May 25, 2017 01:47 IST2017-05-25T01:47:19+5:302017-05-25T01:47:19+5:30

कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्यानंतर बेळगाव तालुका पंचायतीच्या मराठी सदस्यांनी आपला मराठी बाणा दाखविण्यास सुरुवात केली आहे

'Jai Maharashtra' announcement in Belgaum | बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा

बेळगावमध्ये ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्क
बेळगाव : कर्नाटकचे मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्यानंतर बेळगाव तालुका पंचायतीच्या मराठी सदस्यांनी आपला मराठी बाणा दाखविण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी तालुका पंचायतीच्या सभेत ‘जय महाराष्ट्र’चा नारा देत सभागृह दणाणून सोडले. तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी मंत्री रोशन बेग यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत आपण ‘जय महाराष्ट्र’ म्हणणारच, असे सुनावले. यावेळी कन्नड सदस्यांनी यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संतापलेल्या मराठी सदस्यांनी ‘जय महाराष्ट्र’ अशा घोषणा दिल्या़

Web Title: 'Jai Maharashtra' announcement in Belgaum