शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाला खटकले जय भवानी अन् हिंदू; मशाल गीतातून दोन्ही शब्द वगळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 07:19 IST

मशाल गीतातील दृश्य : या गीतामध्ये ३० व्या सेकंदाला ‘हिंदू’ हा शब्द असून अखेरच्या ५० व्या सेकंदाला ‘जय भवानी’ उल्लेख आलेला आहे.

मुंबई : उद्धवसेनेची निवडणूक निशाणी असलेल्या मशाल चिन्हावर नुकत्याच प्रसारित करण्यात आलेल्या ‘मशाल गीता’वर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून, यातील ‘हिंदू’ आणि ‘जय भवानी’ हे दोन शब्द वगळा, अशी नोटीस उद्धवसेनेला पाठवली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ‘हिंदू’ या शब्दावर आम्ही मते मागितलेली नाहीत, त्याचप्रमाणे देवी भवानी हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून, महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे हे शब्द वगळणार नाही, प्रसंगी कोर्टात जाऊ, अशी भूमिका घेतली.

ठाकरे म्हणाले, ‘मशाल गीत’ हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणागीत आहे. यातील ‘हिंदू’ हा शब्द आयोगाला खटकला आहे. मात्र, आम्ही धर्माच्या आधारावर मते मागितलेली नाहीत. याआधी धर्माच्या आधारावर गृहमंत्री अमित शाह तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मते मागितली होती. त्यांच्यावर कारवाई झाली नाही. ठाकरेंनी यावेळी त्या भाषणांचा व्हिडीओ दाखवला. 

‘उद्या जय शिवाजी हा शब्दही काढायला सांगतील...’धर्माच्या नावाखाली प्रचार केल्याप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना निवडणूक आयोगाने सहा वर्षांसाठी मतदान करण्यास व निवडणूक लढविण्यावर बंदी घातली होती, असे ठाकरे यांनी सांगितले. ते म्हणाले, या गीतामध्ये कोरसकडून ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली जात आहे. त्यातील ‘जय भवानी’ हा शब्दच काढून टाकण्यास सांगण्यात आला आहे. उद्या ‘जय शिवाजी’ हा शब्दही काढायला सांगतील. कोणत्याही परिस्थितीत हा शब्द काढणार नाही. वेळ आली तर न्यायालयातही जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

६० सेकंदांचे मशाल गीत ‘शंखनाद होऊ दे, रणदुदंभी वाजू दे’ हे मशाल गीत ६० सेकंदांचे आहे. गीतात ‘हिंदू तुझा धर्म, जाणून घे मर्म, जीव त्यास कर तू बहाल’ कडवे आहे, तर कोरसमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’  शब्द आहेत. यातील हिंदू व जय भवानी हे शब्द निवडणूक आयोगाला खटकले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरे