त्याची गगन भरारी
By Admin | Updated: April 29, 2016 04:36 IST2016-04-29T04:36:07+5:302016-04-29T04:36:07+5:30
आदित्य दिलीप राउत यांनी घरातील वडीलधाऱ्यांच्या एमबीए होण्याच्या इच्छेला बगल देत इंडिगो एयर लाइन्स सेवेत वैमानिक म्हणून रुजू होऊन स्वत:ला सिद्ध केले

त्याची गगन भरारी
पालघर : केळवे (उनभाट) येथील आदित्य दिलीप राउत यांनी घरातील वडीलधाऱ्यांच्या एमबीए होण्याच्या इच्छेला बगल देत इंडिगो एयर लाइन्स सेवेत वैमानिक म्हणून रुजू होऊन स्वत:ला सिद्ध केले आहे. अत्यंत गरीब आणि खडतर परीस्थितिच्या प्रवासातुन यशाची उंच उंच भरारी घेण्याची त्याच्या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
केळवे येथील दिलीप राउत यांचे वडील त्यांच्या वयाच्या ९ व्या वर्षी मरण पावल्या नंतर अत्यंत गरीब असलेल्या त्यांच्या कुटुंबाचा भार उचलला तो त्यांचे वडील बंधू जयवंत राउत याने शिक्षकी पेशा स्विकारुंन त्यानी प्रथम आपल्याला उच्चशिक्षित होण्याच्या ध्येयाला तिलांजलि देत विधवा आई, तिन भाऊ आणि पाच बहिणीच्या पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली.
अशा त्यागी वृतिच्या कुटुंबात वाढलेल्या आदित्यने मेक्यानिकल इंजिनियर व्हावे अशी इच्छा त्याच्या आई-वडिलांची होती. वडील एल एंड टी मधून प्राइम मिनिस्टर श्रम अवार्ड प्राप्त अधिकारी तर आई मुंबईच्या साठे कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत. अशा वेळी आई-वडिलांच्या इच्छेला मोठ्या विश्वासाने बगल देत आपणास वैमानिक व्हायचे आहे. आणि त्यासाठी आपण मला संधी द्यावी असे त्याने आई-वडिलांना समजावून सांगितले. आपल्या मुलाचे धेय गाठण्याची तीव्र इच्छा पाहता त्याला परवानगी मिळाली. त्याने अहमदाबाद एविएशन एकेडेमी मध्ये प्रवेश मिळवून सर्व प्रवेश परीक्षा यशस्वीपणे पार पाडित त्याने कमर्सिअल पायलट लायसन्स मिळवले. (प्रतिनिधी)