हे उतरले रिंगणात

By Admin | Updated: September 27, 2014 05:01 IST2014-09-27T05:01:42+5:302014-09-27T05:01:42+5:30

आघाडी व युतीतील घटक पक्षांनी गुरुवारी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी राज्यभरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती

It's in the fallen ring | हे उतरले रिंगणात

हे उतरले रिंगणात

मातब्बरांचे शक्तीप्रदर्शन !
मुंंबई : आघाडी व युतीतील घटक पक्षांनी गुरुवारी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर शुक्रवारी राज्यभरात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी झुंबड उडाली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीसह शिवसेना व भाजपाच्या मातब्बर उमेदवारांनी राजकीय ताकद दाखवत उमेदवारी दाखल केली.

पुणे-पिंपरी चिंचवड
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), मंत्री हर्षवर्धन पाटील (इंदापूर), भाजपा आ. गिरीष बापट (कसबा), रोहित टिळक (काँग्रेस, कसबा) यांच्यासह तब्बल १४२ उमेदवारांनी अर्ज भरले. पर्वती- भाजपा आ. माधुरी मिसाळ, अभय छाजेड (काँग्रेस), सुभाष जगताप (राष्ट्रवादी), कोथरूड - आ. चंद्रकांत मोकाटे (शिवसेना), खडकवासला - आ. भीमराव तापकीर (भाजपा), वडगाव शेरी - आ. बापू पठारे (राष्ट्रवादी), चंद्रकांत छाजेड (काँग्रेस), पुणे कॅन्टोन्मेंट- आ. रमेश बागवे (काँग्रेस), चिंचवड - आ. लक्ष्मण जगताप (भाजपा), पिंपरी - आ. अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी).

दक्षिण महाराष्ट्र
जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार चंद्रदीप नरके, माजी खा. जयवंतराव आवळे. राधानगरी- आ. के. पी. पाटील(राष्ट्रवादी), इचलकरंजी - माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिरोळ - आ. डॉ. सा. रे. पाटील (काँग्रेस), चंदगड - माजी राज्यमंत्री भरमू पाटील, कोल्हापूर दक्षिण - आ. महादेवराव महाडिक यांचा मुलगा अमल (भाजपा) आदी. डॉ. पतंगराव कदम (काँग्रेस : पलूस-कडेगाव), आर. आर. पाटील (राष्ट्रवादी : तासगाव-कवठेमहांकाळ), शिवाजीराव नाईक (भाजपा : शिराळा), सदाशिवराव पाटील (काँग्रेस : खानापूर-आटपाडी), मदन पाटील (काँग्रेस : सांगली), गोपीचंद पडळकर (भाजपा : खानापूर-आटपाडी), सुरेश शेंडगे (काँग्रेस : तासगाव-कवठेमहांकाळ), विलासराव जगताप (भाजपा : जत), विक्रम सावंत (काँग्रेस : जत) वाई - मदनराव भोसले (अपक्ष), मकरंद पाटील (राष्ट्रवादी ), कोरेगाव - शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी), कऱ्हाड दक्षिण - अतुल भोसले (भाजपा), सातारा-जावळी - शिवेंद्रसिंहराजे भोसले (राष्ट्रवादी)

मराठवाडा
शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा (औरंगाबाद पूर्व, काँग्रेस), अब्दुल सत्तार (सिल्लोड, काँग्रेस), सुनील धांडे (बीड), लोकसभा - प्रीतम मुंडे-खाडे (भाजपा), राजेश टोपे (घनसांगवी), अर्जुन खोतकर (जालना), प्रा. मनोहर धोंडे (कंधार-लोहा), दिलीप कंदकुर्ते (नांदेड दक्षिण), रमेश कराड (लातूर ग्रामीण), संभाजी पाटील निलंगेकर (निलंगा), रूपाताई पाटील निलंगेकर (निलंगा), माजी मंत्री सुरेश वरपूडकर (पाथरी), भाऊ पाटील गोरेगावकर (हिंगोली), जयप्रकाश दांडेगावकर (वसमत), शिवाजी माने (कळमनुरी)

विदर्भात ३६ अर्ज
नागपूर दक्षिण-पश्चिम - भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस, नागपूर पश्चिम- आ. सुधाकर देशमुख (भाजपा), नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे (भाजपा), नागपूर मध्य- आ. विकास कुंभारे (भाजपा), काटोल- मंत्री अनिल देशमुख (राष्ट्रवादी), कामठी- आ. चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा), मोर्शी- आ. हर्षवर्धन देशमुख (राष्ट्रवादी), आर्णी - मंत्री शिवाजीराव मोघे (काँग्रेस), राळेगाव- आ. वसंत पुरके (काँग्रेस), उमरखेड - आ. विजय खडसे (काँग्रेस), यवतमाळ - आ. संदीप बाजोरिया (राष्ट्रवादी), यवतमाळ-माजी आ. मदन येरावार (भाजपा), पुसद-माजी आ. प्रकाश देवसरकर (शिवसेना), ब्रह्मपुरी- आ. विजय वडेट्टीवार (काँग्रेस), बल्लारपूर- आ. सुधीर मुनगंटीवार (भाजपा), राजुरा- आ. सुभाष धोटे (काँग्रेस), वर्धा-आ. सुरेश देशमुख (राष्ट्रवादी), हिंगणघाट - आ. अशोक शिंदे (शिवसेना), साकोली - माजी आ. सेवक वाघाये (काँग्रेस), अहेरी-माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी), आरमोरी - आ. आनंदराव गेडाम (काँग्रेस) आदी.

खान्देश
जळगाव शहर : आ. सुरेशदादा जैन (शिवसेना), राजेश जैन, ललित कोल्हे (मनसे), जामनेर - आ. गिरीश महाजन (भाजपा), जळगाव ग्रामीण- माजी आ. गुलाबराव पाटील (शिवसेना), रावेर - माजी खा. हरिभाऊ जावळे (भाजपा), भुसावळ - माजी मंत्री संजय सावकारे (भाजपा), धुळे ग्रामीण : आ. शरद पाटील (शिवसेना), कुणाल पाटील (काँग्रेस), नंदुरबार : शहादा - क्रीडा मंत्री पद्माकर वळवी (काँग्रेस), नवापूर - आ. शरद गावीत ( राष्ट्रवादी काँग्रेस), अक्कलकुवा - नरेंद्र पाडवी (भाजपा)

उत्तर महाराष्ट्र
नाशिक पूर्व - माजी खा. देवीदास पिंगळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस), नगरसेवक रमेश धोंगडे (मनसे), देवळाली- आ. बबन घोलप यांचे पुत्र योगेश घोलप (शिवसेना), नाशिक मध्य - आ. वसंत गिते (मनसे), नाशिक पश्चिम - आ. नितीन भोसले (मनसे), माजी महापौर दशरथ पाटील (कॉँग्रेस), निफाड - आ. अनिल कदम (शिवसेना), माजी आ. दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस), सिन्नर - आ. माणिकराव कोकाटे (भाजपा/अपक्ष), मालेगाव बाह्य- आ. दादाभाऊ भुसे (शिवसेना), चांदवड - आ. शिरीषकुमार कोतवाल (कॉँग्रेस), माजी आरोग्यमंत्री डॉ. दौलतराव अहेर यांचे पुत्र डॉ. राहुल अहेर (भाजपा), इगतपुरी/त्र्यंबक - आ. निर्मला गावित, नांदगाव- माजी आ. अनिल अहेर (अपक्ष), येवला - संभाजी पवार (शिवसेना), दिंडोरी - माजी आ. नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस), आ. धनराज महाले (शिवसेना) आदी. राहुरी - आ. शिवाजीराव कर्डिले (भाजपा), नगर शहर - सत्यजित तांबे (काँग्रेस), कोपरगाव - आशुतोष काळे (शिवसेना), श्रीगोंदा - बाळासाहेब नाहाटा (राष्ट्रीय समाज पक्ष)

मुंबई-कोकण
बोरीवली - आ. विनोद तावडे (भाजपा), दहिसर - आ. विनोद घोसाळकर (शिवसेना), शितल म्हात्रे (काँग्रेस), मुलुंड - सरदार तारासिंह (भाजपा), सत्यवान दळवी (मनसे), विक्रोळी - आ. मंगेश सांगळे (मनसे), सुनिता राऊत (शिवसेना), जोगेश्वरी (पू) - आ. रविंद्र वायकर (शिवसेना), दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना), शालिनी ठाकरे (मनसे), चेंबुर - चंद्रकांत हांडोरे (काँग्रेस), कांदीवली - अतुल भातखळकर (काँग्रेस), अंधेरी - सुरेश शेट्टी (काँग्रेस), विलेपार्ले - कृष्णा हेगडे (काँग्रेस), घाटकोपर (प.) - दिलीप लांडे (मनसे), वांद्रे (पू) - प्रकाश सावंत (शिवसेना), कलीना - कृपाशंकर सिंह (काँग्रेस), चंद्रकांत मोरे (मनसे), मालाड (प.) - असलम अली शेख (काँग्रेस), रामनारायण बारोट (भाजपा), गोरेगाव - शशांक राव (राष्ट्रवादी काँग्रेस), वर्सोवा - बलदेव खोसा (काँग्रेस), नरेंद्र वर्मा (राष्ट्रवादी काँग्रेस) आदी.
कोकण : रत्नागिरी - बाबा परुळेकर (भाजपा), गुहागर - विनय नातू (भाजपा), सिंधुदुर्ग : कणकवली- आ. विजय सावंत, कुडाळ - शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, सावंतवाडी - राजन तेली (अपक्ष ) आदी.

Web Title: It's in the fallen ring

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.