शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Exclusive: मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा....; ‘त्या’ दिवशी फडणवीसांनी महाजनांच्या कानात सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 20:56 IST

गिरीश महाजनांनी केला खुलासा..फडणविसांनी महाजनांच्या कानात काही सांगितले व महाजन लगेच चिंतातूर चेहरा करत निघून गेले.

अजय पाटील,

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - विधानपरिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपने ५ उमेदवार उभे केले होते व सर्व उमेदवार विजयी करून आणले. ही निवडणूक जिंकल्यानंतर भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते विधानभवनाच्या प्रागंणातच विजयी आनंदोत्सव साजरा करत होते. सर्वच नेते आनंदोत्सव व घोषणाबाजी करत असताना, तत्कालीन विधानसभेचे विरोधी पक्षनेते व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयोत्सव साजरा करत असलेल्या नेत्यांमधून मार्ग काढत भाजपचे संकटमोचक असलेले गिरीश महाजन यांना मिठी मारली, महाजनांनीही त्यांना मिठी मारली. फडणविसांनी महाजनांच्या कानात काही सांगितले व महाजन लगेच चिंतातूर चेहरा करत निघून गेले. त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या, त्या सर्वच महाराष्ट्राने पाहिल्या आहेत.

त्यामुळे फडणविसांनी  २० रोजीच्या भाजपच्या विजयोत्सवात महाजनांच्या कानात नेमके काय सांगितले ? याबाबत अनेकांना उत्सुकता होती. याबाबत ‘लोकमत’ सोबत बोलत असताना गिरीश महाजन यांनी अखेर कानात सांगितलेल्या या गोष्टींचा खुलासा केला आहे. फडणविसांनी मिठी मारल्यानंतर कानाजवळ येवून, ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’ , एवढं सांगितले. फडणविसांचे एवढे शब्द ऐकून त्या विजयोत्सवातून थेट फडणविस यांचा ‘सागर’ या निवासस्थानी पोहचलो व त्यानंतरच हे ‘ऑपरेशन’ मार्गी लावले असल्याची माहिती महाजनांनी सांगितली. त्याठिकाणाहूनच शिंदेसोबत असलेल्या आमदारांना सुरतला पाठविण्याचे नियोजन करून, हे ऑपरेशन सुरु केले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर व एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर हे ऑपरेशन अखेर फत्ते झाले असल्याचेही महाजनांनी ‘लोकमत’ ला सांगितले.

दीड वर्षांपुर्वींच सुरु झाले होते मिशनएकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार महाविकास आघाडी सरकारमध्ये आमदारांचेच कामे होत नसल्याने नाराज होते,  दिवसेंदिवस ही नाराजी वाढत गेली होती. याबाबत केवळ काही दिवसातच ही नाराजी उफाळून आली नाही. हे सर्व काही दिड वर्षांपुर्वीच ठरलं असल्याचेही महाजनांनी सांगितले. तसेच याबाबत दिल्ली स्तरावर काही बैठका देखील पार पडल्या असल्याचेही महाजनांनी सांगितले. मात्र, शिवसेनेचे आमदार विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतरच बंड करतील याबाबत आपल्याला फार काही कल्पना नसल्याचे महाजनांनी सांगितले.

मंत्रीपदाबाबत मात्र मौनपक्षासाठी काम करत असून, पक्षाच्या हितासाठी जी काही जबाबदारी सोपविण्यात आली ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे महाजनांनी सांगितले. नव्या शिंदे सरकारात महाजनांना कोणते मंत्रीपद ? याबाबत विचारले असता महाजनांनी याबाबत मौन पाळले. तसेच पालकमंत्रीपदाबाबत देखील कोणताही खुलासा केला नाही. मात्र, आगामी येत्या तीन महिन्यात नाशिक महापालिकेच्या निवडणुका, तसेच याआधी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद महाजनांनी सांभाळले असल्याने महाजनांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती भाजपच्या विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGirish Mahajanगिरीश महाजनEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना