शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

चित्रपट ‘सेन्सॉर’ संमत झाल्यानंतर वादंग घालणे चुकीचे : मधुर भांडारकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2019 20:29 IST

एकदा चित्रपट सेन्सॉर संमत झाला की तो सोडून द्यावा. कोणत्याही पद्धतीने वादंग होणं हे दुर्दैवी आहे..

ठळक मुद्दे ‘इंदू सरकार’ हा चित्रपट जतन करण्यासाठी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त

पुणे :  सेन्सॉर बोर्डाने एखाद्या चित्रपटाला जर परवानगी दिली असेल तर त्यावर वादंग निर्माण करणे चुकीचे आहे. एकदा चित्रपट सेन्सॉर संमत झाला की तो सोडून द्यावा. कोणत्याही पद्धतीने वादंग होणं हे दुर्दैवी आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते मधुर भांडारकर यांनी चित्रपटांवरून वादंग निर्माण करणाऱ्यांवर टीका केली. मात्र जेव्हा काही चित्रपटांबददल असे वादंग निर्माण झाले. त्या निर्मात्यांच्या बाजूने मी उभा राहिलो. पण  ‘इंदू सरकार’च्या वेळी वादाला तोंड फुटले. तेव्हा माझ्या बाजूने कुणी उभे राहिले नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.मधुर भांडारकर यांनी 2017 साली दिग्दर्शित आणि सहनिर्मित केलेल्या ‘ इंदू सरकार’ या राजकीय चित्रपटाची  राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात शुक्रवारी भर पडली. भांडारकर यांनी  ‘ चांदनी बार’,  पेज थ्री’,‘कॉर्पोरेट’, ‘ट्रँफिक सिग्नल’,‘फँशन’ या चित्रपटानंतर  ‘इंदू सरकार’ हा चित्रपट जतन करण्यासाठी संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्त केला. दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामुळे वादंग निर्माण झाला होता. या चित्रपटात 1975 च्या आणीबाणीच्या काळामधील चित्रण दाखविताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि त्यांचे चिरंजीव संजय गांधी यांना चुकीच्या पद्धतीने समोर आणण्यात आले आहे असा आक्षेप कॉंग्रेस समर्थकांनी घेतला होता. कोणत्याही चित्रपटांवरून निर्माण होणा-या वादंगासंदर्भात  मधुर भांडारकर यांना पत्रकारांनी विचारले असता ’चित्रपट सेन्सॉर संमत झाल्यास त्यावर वाद घालणं चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितलं. हा चित्रपट संग्रहालयाकडे देताना आनंद होत आहे.  आजपर्यंत सगळे चित्रपट सामाजिक प्रश्न डोळ्यासमोर ठेवूनच निर्माण केल्याने रसिक त्याच्याशी आपोआप रिलेट होऊ शकले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.-------------------------------------------------------------------------------------------इफ्फीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष दणक्यात साजरे होणार; एफटीआयआयचे विद्यार्थी सहभागी करून घेणार देशविदेशातील रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या  ‘गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ (इफ्फी) चे यंदाचे  सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष दणक्यात साजरे केले जाणार असून, त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. ज्या इफ्फीमध्ये विद्यार्थी विभाग बंद करण्यात आला. एफटीआयआयच्या विद्याथर््यांना इफ्फीपासून दूर ठेवण्यात आले. त्याच एफटीआयआयच्या विद्याथर््यांना यंदा व्यवस्थापनामध्ये सहभागी करून घेतले जाणार असल्याचे इफ्फीच्या मुख्य आयोजन समितीचे सदस्य मधुर भांडारकर यांनी सांगितले. तसेच इफ्फीसाठी काही चित्रपटगृह वाढविण्याचा विचार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMadhur Bhandarkarमधुर भांडारकर bollywoodबॉलिवूडcinemaसिनेमा