शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस व मी एकत्र येणार ही ब्रेकिंग न्यूज झाली- अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 13:29 IST

चंद्रकांत पाटील येणार असल्याचे कोणाला माहीत झाले नाही. अन्यथा त्यांचेही नाव त्यात आले असते अशी मिश्किल टिप्पणीही

ठळक मुद्देपिंपरीत कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

पुणे (पिंपरी) : प्रत्येक कोरोना रुग्णाला उपचार मिळावेत, बेड उपलब्ध व्हावा त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोविड सेंटर उभारले आहे. सर्वांनी एकत्र येत ही लढाई लढली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. देवेंद्र फडणवीस व माझ्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन होणार असल्याने, आम्ही एकत्र येणार, ही ब्रेकींग न्यूज झाली. चंद्रकांत पाटील येणार असल्याचे कोणाला माहीत झाले नाही. अन्यथा त्यांचेही नाव त्यात आले असते, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी यावेळी केली.पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथे ऑटो क्लस्टर प्रदर्शन केंद्रात २०० खाटांचे कोविड सेंटर उभारले. उपमुख्यमंत्री पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी त्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी पवार बोलत होते. 

अजित पवार म्हणाले, कोरोना हे मोठे संकट आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोपप्रत्यारोप करण्यापेक्षा चूक लक्षात आणून देऊन काम केले पाहिजे. काळानुरूप काही पावले आपल्याला उचलावी लागली. कोरोनाची लढाई सर्वांनी एकत्र येऊन लढली पाहिजे. प्रत्येक कोरोना रुग्णाला बेड उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठी महापालिका प्रयत्नरत आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करताना खबरदारी बाळगली पाहिजे. कोरोनाचे संकट गणरायाने दूर करावे, असे साकडे घालतो. 

फडणवीस म्हणाले, राज्यात दररोज १४ ते १५ हजार रुग्ण आढळत आहेत. यातील २० टक्के रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागते. पुणे जिल्ह्यात कोरोना चाचणी वाढविण्यात आल्याने रुग्ण संख्या वाढली. त्या सर्वांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. महापालिकेने त्यासाठी कोविड सेंटर उभारले आहे. सर्वांनी मिळून कोरोना विरूध्दची लढाई लढू या.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारchandrakant patilचंद्रकांत पाटीलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliticsराजकारण