शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या ‘लेटरबॉम्ब’मध्ये आहे काय?, माध्यमांत रंगली दिवसभर चर्चा; लोकमतकडे पत्राची प्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 08:21 IST

Nitin Gadkari : नितीन गडकरी यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली

मुंबई : राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील अडथळ्यांबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविल्याचे वृत्त लोकमतने दिल्यानंतर शनिवारी दिवसभर या पत्राची सगळ्या माध्यमांवर चर्चा सुरू होती. या पत्रातील मुद्दे चर्चेचे ठरले आहेत.नितीन गडकरी यांनी पाठविलेल्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दखल घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी गृह विभागाला दिल्याची माहिती आहे. गृह विभागाने राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना १३ ऑगस्टला एक पत्र पाठवून वाशिम जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडथळे आणत आहेत, विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडत आहेत आदी तक्रारीबाबत अहवाल मागविण्यात आला आहे. 

अकोला व नांदेड या २०२ किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्गादरम्यान चौपदरीकरणाची कामे चार पॅकेजमध्ये सुरू आहेत. मेडशी ते वाशिम या पॅकेज २ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (१२ किमी) निर्माण करण्याच्या कामाचाही समावेश आहे. परंतु या बायपास व मुख्य रस्त्याचे काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबविलेले असल्याचे मला सांगण्यात आले आहे.या मतदारसंघात सुरू असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचे काम एक पूल वगळता पूर्ण होत आले आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारास मज्जाव केला जात आहे. काम सुरू केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदाराने आहे त्या स्थितीत काम अंतिम करण्याची विनंती केलेली आहे.पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम (अंदाजे १३५ कोटी) आमच्या मंत्रालयाने हाती घेतले आहे. परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचे काम पूर्णत्वास आलेले आहे. वाशिम जिल्ह्यातील काम विशेषत: सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचे काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबविलेले होते, अशी माहिती देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळे कंत्राटदाराने पुन्हा काम सुरू केले असता शिवसेना कार्यकर्त्यांनी यंत्रसामुग्रीची जाळपोळ करून कंत्राटदारांचे अधिकारी, कर्मचारी यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झाले आहे.

गडकरी यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश लगेच दिलेले आहेत. या चौकशीत या प्रकरणात खरेच शिवसैनिक आहेत की, उगाच बोंबाबोंब केली जात आहे, ते बाहेर येईल. परंतु गडकरी यांनी शिवसेनेचा उल्लेख करायला नको होता. शिवसेनेचा विकासाला विरोध नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात अधिकाऱ्यांना काळे फासणारे, कंत्राटदार, अधिकाऱ्यांना उठाबशा काढायला लावणारे भाजपसोबत आहेत, त्या बाबत तुम्ही गप्प का?- खा. अरविंद सावंत, मुख्य प्रवक्ते, शिवसेना

राजकारणाचे गुन्हेगारीकरण हा वीस वर्षांपूर्वीचा मुद्दा होता. आज गुन्हेगारांचे राजकियीकरण झाले आहे. काही गुन्हेगार राजकारणात आले आहेत किंवा नेत्यांची चमचेगिरी करून खंडणी वसूल करणे, ब्लॅकमेलिंग करणे असे प्रकार घडत आहेत. अशांना मकोकाअंतर्गत तत्काळ अटक केली पाहिजे.- सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री व ज्येष्ठ नेते, भाजप

या विषयावर माझी प्रतिक्रिया देणे योग्य होणार नाही. मी एवढेच सांगते की माझ्या मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गाची ९० टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. काही ठिकाणी लोकांचा विरोध असल्याने कामे थांबलेली होती.              - भावना गवळी, शिवसेना खासदार, यवतमाळ-वाशिम मतदारसंघ

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरे