पंतप्रधानांचे भाषण निम्म्या शाळांत दाखविणो शक्य
By Admin | Updated: September 2, 2014 02:17 IST2014-09-02T02:17:23+5:302014-09-02T02:17:23+5:30
शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष भाषण होणार असून ते सर्व शाळांमध्ये दाखविणो बंधनकारक करण्यात आले आहे.
पंतप्रधानांचे भाषण निम्म्या शाळांत दाखविणो शक्य
पुणो : शिक्षक दिनानिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष भाषण होणार असून ते सर्व शाळांमध्ये दाखविणो बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी केंद्र सरकारने राज्यांकडून टीव्ही, रेडिओ, इंटरनेट या माध्यमांची माहितीही मागविली आहे. मात्र महाराष्ट्रातील निम्म्याच शाळांधील विद्यार्थी टीव्हीवर मोदींचे भाषण ऐकू शकणार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
बहुतांश शाळांमध्ये रेडिओ किंवा इंटरनेटचा आधार घ्यावा लागणार आहे. नरेंद्र मोदी शिक्षक दिनानिमित्त विद्याथ्र्याशी संवाद साधणार आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण टीव्ही, रेडिओ व इंटरनेटच्या माध्यमातून केले जाणार आहे. हे भाषण ऐकणो सर्वासाठी बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी शाळांमध्ये उपलब्ध असलेले टीव्ही, रेडिओ, इंटरनेटची माहिती मागविण्यात आली. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून केंद्राला पाठविण्यात आलेल्या माहितीनुसार 1 लाख 4 हजार शाळांपैकी सुमारे 49 हजार शाळांमध्ये टीव्ही उपलब्ध होऊ शकेल. ग्रामीण भागातील बहुतेक शाळांमध्ये टीव्ही किंवा इंटरनेटची व्यवस्था नाही. टीव्ही लावून सर्व विद्यार्थी एकाच ठिकाणी बसू शकतील एवढे सभागृहही उपलब्ध होणो,बहुतांश ठिकाणी शक्य नाही.
शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार, सुमारे 41 हजार शाळांमध्ये रेडिओद्वारे भाषण ऐकविले जाणार आहे. तसेच सुमारे 3 हजार शाळांमध्ये यू - टय़ूबवर भाषण पाहण्याची व्यवस्था केली जाईल. काही शाळा सॅटकॉम, एज्युसॅट, वेबकास्ट या माध्यमातून भाषण ऐकण्याची व्यवस्था करणार आहेत.
केंद्र सरकारकडून पंतप्रधान मोदी यांचे भाषण सर्व शाळांमध्ये दाखविण्याचे बंधनकारक केले आहे. त्यानुसार सर्व शाळांमध्ये असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. त्याची माहिती केंद्राला पाठविली आहे. पंतप्रधानांचे भाषण किती शाळांमध्ये दाखविण्यात आले. किती विद्याथ्र्यानी ते ऐकले, याचीही माहिती द्यायची आहे.
- एस. चोक्कलिंगम,
शालेय शिक्षण आयुक्त
गोव्यात हवेत 4क्क् टीव्ही !
च्पणजी : शिक्षक दिनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात ऐकविण्याचा फसवा निघाल्याने राज्यातील सुमारे चारशे विद्यालयांकडे टीव्ही संच नसल्याचे आढळून आल्यानंतर अधिका:यांची धावपळ उडाली आहे.
च्शुक्रवारी दुपारी अडीच ते पावणोसहा या वेळेत देशभर एकाचवेळी पंतप्रधानांचे भाषण दूरदर्शनवर दाखविले जाणार आहे. प्रत्येक विद्यालयातील मुलांनी हे भाषण ऐकावे, असे ठरले आहे. त्यानुसार शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी सोमवारी भागशिक्षणाधिका:यांची बैठक घेतली. मात्र चारशे विद्यालयांकडे टीव्ही संच नसल्याची माहिती बैठकीत पुढे आली. त्यावर संबंधित विद्यालयांनी गावातील पंचायतीत मुलांना नेऊन तेथे भाषण ऐकावे, अशी सूचना करण्यात आली.
च्पंचायतीत टीव्ही नसेल, तर एखाद्या संघटनेच्या कार्यालयातील टीव्हीचा वापर करावा. तेही शक्य नसल्यास टीव्हीची व्यवस्था असलेल्या एखाद्या विद्याथ्र्याच्या घरी सर्वानी भाषण ऐकावे, असे ठरले आहे. त्यामुसार भागशिक्षणाधिकारी टीव्हीची व्यवस्था करण्याच्या कामात गुंतले आहेत, अशी माहिती सूत्रंनी दिली. (खास प्रतिनिधी)