युती तुटणार हे माहितीच होते

By Admin | Updated: February 3, 2017 04:38 IST2017-02-03T04:38:15+5:302017-02-03T04:38:15+5:30

महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती तुटणार हे आपण डायरीवर लिहून ठेवले होते, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी ती डायरीच पत्रकारांपुढे ठेवली!

It is known that the alliance will be broken | युती तुटणार हे माहितीच होते

युती तुटणार हे माहितीच होते

नांदेड : महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेसोबतची युती तुटणार हे आपण डायरीवर लिहून ठेवले होते, असे सांगत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी ती डायरीच पत्रकारांपुढे ठेवली!
नांदेड दौऱ्यावर आलेले खा. दानवे म्हणाले, युती होणार नाही ही बाब पूर्वीच माहिती होते. त्यामुळे युती तुटली तरी भाजपाला निवडणुकीची तयारी करण्यास अडचण झाली नाही़ आगामी काळातही आता भाजपाला युतीची गरज राहणार नसल्याचे सांगत युती तुटण्याचे कारण पारदर्शक कारभार हेच आहे, असेही दानवे यांनी सांगितले. भाजपाने पारदर्शक कारभाराचा आग्रह धरला होता, या विषयावर समन्वय समिती स्थापन करण्याबाबतही चर्चा झाली होती़ मात्र शिवसेनेने या विषयावर मार्ग न काढता युती तोडणे पसंद केले़, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: It is known that the alliance will be broken