शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

संपूर्ण देशात प्रत्येक भागात २४ तास वीज देणं शक्य, कारण...; KCR यांनी दिलं वचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 18:30 IST

कोळसा आयात करायची गरज का? जेवढे अदानीवर प्रेम तितके देशातील जनतेवर का नाही? असा सवाल केसीआर यांनी मोदींना केला.

नांदेड - देशाची ४ लाख १० हजार मेगावॅट पॉवर क्षमता आहे. २ लाख १५ हजार मेगावॅटपेक्षा कधीही जास्त वापर विजेचा होत नाही. ४० हजार मेगावॅट वीज उत्पादन करणारे कारखाने देशातील विविध भागात आहे. पण तरीही कुठल्याही राज्यात २४ तास वीज मिळत नाही. अनेक राज्यात शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कधी दिवसा तर कधी रात्री लाईट येते. लांबलचक भाषण, खोटी भाषणे कितीदिवस ऐकत राहणार? असं सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. 

मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, वीज खासगीकरण केल्यास आम्ही सत्तेत आल्यावर पुन्हा परत घेऊ. ९० टक्के वीज कंपन्यांचे सरकारीकरण होईल. आम्ही तेलंगणा राज्यात ते करून दाखवलंय. जर देशाची जनता आम्हाला संधी दिली तर २ वर्षात देशात उच्च गुणवत्तेची वीज २४ तास देऊ. आम्ही हे राज्यात केलेय. देशात तेलंगणा हे एकमेव राज्य आहे जिथे २४ तास वीज दिली जाते असं त्यांनी सांगितले. 

कोळसा आयात करण्याची गरज काय? कोळसा आयात करायची गरज का? जेवढे अदानीवर प्रेम तितके देशातील जनतेवर का नाही? केंद्रानं राज्यांना कोळसा आयात करण्याचे निर्बंध घातलेत. कोळसा देशात इतक्या प्रमाणात आहे तरी देशात बाहेरून कोळसा आयात करावा लागतो. देशात २-३ रेल्वे रुळ बनवले तर कोळसा वाहतूक करण्यात सोप्पं जाईल. १ किलोही कोळसा आयात करण्याची देशात गरज नाही. राज्यांना बळजबरीनं कोळसा खरेदी करायला सांगितले जाते. त्यामुळे परिवर्तन होणं काळाची गरज आहे असंही मुख्यमंत्री केसीआर म्हणाले. 

जनता पाण्यापासून वंचित का? सरकार दमदार असेल आणि रणनीती बदलेल तर प्रत्येक एकरला पाणी देऊ शकतो. पाणी मुलभूत गरज आहे. देशात पाण्याची कमतरता आहे. दुषित पाणी पिऊन लोकांचं आरोग्य बिघडत आहे. पाण्यासाठी युद्ध करण्याची देशात गरज आहे का? राज्याराज्यांमध्ये पाण्यावरुन लढाई सुरू आहे. भरपूर पाणी प्रत्येक एकरला देऊ शकतो. पाणी संपत्ती निसर्गाने दिलीय मग जनता यापासून वंचित का? पुढील १०० वर्ष शुद्ध पाण्याची कमतरता देशाला भासणार नाही. संपत्ती राहूनही पिण्याच्या पाण्यापासून देश तरसतो आहे. बीआरएस जर सरकार बनवेल तर पाण्याचे धोरण राबवेल असंही केसीआर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाelectricityवीजIndiaभारत