शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाईन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची कसून पडताळणी करणे आवश्यक’, कामगारमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 10:15 IST

Maharashtra Government News: ऑनलाइन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी वर्कर्समार्फत ग्राहकांना सुरक्षित सेवा पुरविली जावी, यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची कसून पडताळणी करणे आवश्यक आहे, याकरिता सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिले.

मुंबई - ऑनलाइन प्लॅटफॉर्म, गिग आणि डिलिव्हरी वर्कर्समार्फत ग्राहकांना सुरक्षित सेवा पुरविली जावी, यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची कसून पडताळणी करणे आवश्यक आहे. तसेच ग्राहकांना ही सेवा निर्दोष, सुरक्षित आणि कायद्याच्या चौकटीत मिळावी, याकरिता सर्वसमावेशक आराखडा तयार करण्याचे निर्देश कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी कामगार आणि गृह विभागाच्या मंत्रालयात आयोजित संयुक्त बैठकीत दिले.

झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट आदी विविध डिलिव्हरी व सेवा देणाऱ्या कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा पुरवीण्यासाठी डिलिव्हरी पार्टनर्स नियुक्त करतात. सध्या या कंपन्या त्यांची ऑनलाईन, फेसलेस पद्धतीने नोंदणी करून नंतर ही माहिती थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन एजन्सीकडे पाठवतात; मात्र या एजन्सींना पडताळणीचे अधिकार कोणी व कोणत्या निकषांवर दिले, त्यांच्या प्रक्रियेला कायदेशीर आधार काय, याबाबत मंत्री ॲड. फुंडकर यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आमदार सुमित वानखेडे, आमदार दादाराव केचे,  माजी खासदार किरीट सोमय्या, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव  श्रीमती आय.ए. कुंदन, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सह सचिव रवींद्र शिसवे, गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, गिग व प्लॅटफॉर्म वर्कर्सची नोंदणी ज्या प्लॅटफॉर्मवर ‘पार्टनर’ म्हणून केली जाते, त्या कंपन्यांनीच या कामगारांच्या पार्श्वभूमी तपासाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली पाहिजे. डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचे व्यवसायिक रजिस्ट्रेशन, चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स आहे का, त्यांना पगार कसा व कोणत्या माध्यमातून दिला जातो, या सर्व बाबींचा संबंधित सर्व विभागांच्या समन्वयाने अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री ॲड. फुंडकर यांनी यावेळी दिले.

सायबर विभागाकडे नोंदणी गरजेचीराज्यातील ऑनलाइन फूड व अन्य वस्तू वितरण करणाऱ्या कंपन्यांमध्ये कार्यरत गिग व प्लॅटफॉर्म कामगारांच्या सुरक्षिततेसह त्यांच्या नियमनासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज या बैठकीमध्ये अधोरेखित करण्यात आली. राज्यातील बहुतेक अ‍ॅग्रीगेटर कंपन्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे काम करत असून, त्या थेट कर्मचारी भरती न करता तृतीय पक्ष (थर्ड पार्टी) संस्थांमार्फत गिग कामगारांची नियुक्ती करतात. त्यामुळे पारंपरिक नियोक्ता-कामगार संबंध निर्माण होत नाहीत आणि जबाबदाऱ्यांमध्ये अस्पष्टता राहते. गिग कामगारांची नियुक्ती प्रामुख्याने अ‍ॅप-आधारित प्रणालीद्वारे केली जाते. यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, बँक तपशील, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन कागदपत्रे, विमा, ई-श्रम नोंदणी यांसह विविध कागदपत्रे आवश्यक ठरवली जातात. मात्र, या प्रक्रियेत एकसमान नियमावली गरजेची आहे. त्याचप्रमाणे सर्व गिग कामगारांची सायबर विभागाकडे नोंदणी, तसेच क्यूआर कोड असलेले ओळखपत्र बाळगणे सक्तीचे करण्याबाबत आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सादर करणे अनिवार्य करण्याबाबत बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.

बैठकीत राज्यस्तरीय गिग कामगार नोंदणी व ऑनलाइन कंपन्यांची परवाना प्रणाली, तसेच डिजिटल ओळख व युनिक आयडी प्रणाली विकसित करणे, अपघात विमा व सामाजिक सुरक्षा योजना लागू करणे, तक्रार निवारण यंत्रणा व कंपन्यांची जबाबदारी निश्चित करणे आदी महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ओला, उबरसारख्या कंपन्यांमध्ये महिला प्रवाशांना महिला चालक निवडण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे, प्रत्येक कंपनीने गिग कामगारांच्या कामकाजाचे नियमित ऑडिट करून संशयास्पद बाबी आढळल्यास तिमाही अहवाल पोलिसांकडे सादर करणे आदी मुद्द्यावरही यावेळी चर्चा करण्यात आली.

राज्यातील वाढत्या डिजिटल वितरण व्यवस्थेमध्ये नागरिकांची सुरक्षितता प्सर्वाधिक महत्वाची आहे. त्यामुळे गिग व प्लॅटफॉर्म कामगारांसाठी गृह विभागाच्या समन्वयातून स्वतंत्र व स्पष्ट धोरणात्मक चौकट तयार करण्याचे निर्देशही मंत्री श्री. फुंडकर यांनी यावेळी दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Worker Verification in Online, Gig Sectors Crucial: Labor Minister Orders

Web Summary : Labor Minister mandates thorough verification of gig and online platform workers for secure service delivery. A comprehensive framework involving registration, audits, and coordination with the Home Department will be established to ensure worker safety and accountability.
टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारEmployeeकर्मचारी