शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

समीर वानखेडे आणि शाहरुखमध्ये अनेकदा झालं होतं संभाषण; याचिकेत मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 15:29 IST

sameer wankhede chat : समीर वानखेडे यांच्या याचिकेत एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.

sameer wankhede chat news | मुंबई : दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयच्या समन्सवर दिलासा देण्यास नकार दिल्याने एनसीबीचे तत्कालीन संचालक समीर वानखेडें यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अशातच वानखेडे यांच्या याचिकेत एक मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे समीर वानखेडे यांनी बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानसोबत झालेल्या संभाषणाची प्रत याचिकेसोबत जोडली आहे. तसेच 'माझ्या माझ्या मुलाची काळजी घे' असे शाहरूखने तत्कालीन अधिकारी वानखेडे यांना सांगितले आहे. 

दरम्यान, समीर वानखेडे यांनी याचिकेत शाहरूख खानसोबतचे ३ आणि ४ ऑक्टोबरचे मेसेज उघड केले आहेत. शाहरूखने आपल्याला पाठवलेले मेसेज वानखेडे यांनी मांडले असून शाहरूखनेच आपल्याशी प्रथम संपर्क साधल्याचे वानखेडे यांनी म्हटले आहे. तसेच शाहरूखने त्यांच्या कार्याचे कौतुक केले असल्याचे पुरावे वानखेडे यांनी कोर्टात सादर केले आहेत, अशी माहिती एबीपी माझाने दिली आहे.

वानखेडे यांचा मोठा खुलासासमीर वानखेडे यांनी कोर्टात केलेल्या याचिकेत शाहरूखसोबतच्या संभाषणाचा खुलासा केला आहे. याचिकेत नमूद असलेल्या चॅटनुसार शाहरूखने वानखेडे यांना म्हटले, "तुम्ही मला वचन दिले होते की, त्याला सोडून देऊ आणि अशा पद्धतीचे काहीही करणार नाही, ज्याने त्याला त्रास होईल. आर्यनला तुरूंगात टाकू नका, तो एक चांगला माणूस बनेल यापद्धतीने त्याच्याशी व्यवहार करा. तो तुरूंगात गेल्यास पूर्णपणे तुटेल. तुम्ही म्हणाल ते मी करेन पण माझ्या मुलासोबत असा व्यवहार करू नका. नवाब मलिक जे काही बोलत आहेत त्याबद्दलही मी मध्यस्थी करेन आणि त्यांना असे न बोलण्यास सांगेन. कायद्याला धरून मी तुमच्याकडे भीकच मागू शकतो." यावर शाहरूखला रिप्लाय देताना वानखेडे यांनी सातत्याने कायद्याचा दाखला दिला आहे.

 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेShahrukh Khanशाहरुख खानAryan Khanआर्यन खानbollywoodबॉलिवूड